Hair Growth Tips sakal
लाइफस्टाइल

Long Hair Tips लांबसडक केस हवेत? किचनमधील या 3 गोष्टींचा हेअर केअर रूटीनमध्ये लगेचच करा समावेश

Hair Growth Tips : तुमच्या स्वयंपाक घरामध्ये अशा काही गोष्टी आढळतील, ज्यांचा योग्यरित्या वापर केल्यास तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते.

सकाळ डिजिटल टीम

आपलेही केस लांबसडक, मऊ आणि सुंदर असावेत; अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. लांबसडक केस मिळवण्यासाठी महिलावर्ग नको-नको ते उपायही करतात. पण कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींचा वापर केल्यासही केसांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. 

तुमच्या स्वयंपाकघरामध्येही असे कित्येक प्रभावी व घरगुती औषधोपचार दडलेले आहेत. पण आपण नक्कीच याकडे दुर्लक्ष करून महागड्या केमिकलयुक्त ट्रीटमेंट करत असणार, हो ना?    

स्वयंपाकघरात आढणाऱ्या काही गोष्टींचा केसांच्या वाढीकरिता वापर केल्यास केसांना मुळासकट पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल. इतकेच नव्हे तर केस चमकदारही होतील. चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय ( Effective Home Remedies For Hair Growth )

अंड्याचे हेअर मास्क

अंडे म्हणजे प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत. केसांच्या वाढीसाठीही प्रोटीन अतिशय आवश्यक असते. अंड्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केस जाड व मऊ राहण्यासही मदत मिळते. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून एकदा अंड्याचे हेअर मास्क वापरावे. 

कसे वापरावे हेअर मास्क

एक अंडे फोडून त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल व एक चमचा मध मिसळा. हे हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत. या हेअर मास्कमुळे केसांना जीवनसत्त्वे, झिंक, लोह, सेलेनियम यासारख्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.  

मेथी हेअर मास्क

मेथीच्या दाण्याचे हेअर मास्क वापरल्यासही केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल. दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये मेथीचे दाणे वाटून त्याची पातळी पेस्ट करून घ्यावी.

ही पेस्ट 20 मिनिटांसाठी केसांवार लावा. यानंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्या. मेथीतील औषधी गुणधर्मामुळे केसांचे तुटणे, केस गळणे इत्यादी समस्या कमी होतील.  

कांद्याचे हेअर मास्क

लांबसडक केस हवे असल्यास आपल्या हेअरकेअर रूटीनमध्ये कांद्याचा समावेश नक्की करावा. कांद्याचा रस काढून केसांवर लावणे फायदेशीर ठरेल. एक कांदा किसून घ्यावा. किसलेल्या कांद्यातील रस दुसऱ्या भांड्यात गाळावा. कापसाच्या मदतीने हा रस केसांच्या मुळांवर लावा व हलक्या हाताने मसाज करावा.

10 ते 15 मिनिटांनंतर केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत. कांद्यातील औषधी गुणधर्म केसांच्या वाढीसाठी पोषक असतात, म्हणून कित्येक आयुर्वेदिक उपचारांमध्येही कांद्याचा वापर केला जातो.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: लोणीमधील शेतकरी मेळाव्याला शाहांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT