गुणकारी तांदळाचे पाणी Esakal
लाइफस्टाइल

Rice Water For Skin: शून्य रुपयांमध्ये त्वचेवर Glow हवाय, मग ट्राय करा तांदळाचं पाणी

जर शून्य रुपये खर्च करून तुमची त्वचा सुंदर होणार असेल आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होणार असतील तर. कदाचित हे एकून अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे शक्य आहे. यासाठी तुम्ही राईस वॉटर म्हणजे तांदळ्याच्या Rice पाण्याचा वापर करू शकता

Kirti Wadkar

सुंदर त्वचेसाठी अनेकजण हवे ते उपाय करत असतात. महागडे प्राॅडक्ट आणि ट्रिटमेंटसाठी खर्च करतात. त्वचेवर ग्लो Face Glowयावा किंवा चेहऱ्यावरील डाग दूर होवून चेहरा उजळ व्हावा यासाठी अनेक उपाय केले जातात. Beauty Tips Marathi Rice Water for Glowing Skin

अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या प्राॅडक्टमध्ये Face Care Products मोठ्या प्रमाणात केमिकल्स असल्याने त्वचेवर कालांतराने दुष्परिणाम दिसू लागतात. यासाठीच त्वचेसाठी नैसर्गिक उपाय Natural Remedies for Skin Care करणं हे कायम उपयुक्त ठरतं.

जर शून्य रुपये खर्च करून तुमची त्वचा सुंदर होणार असेल आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होणार असतील तर. कदाचित हे एकून अनेकांना आश्चर्य वाटेल. मात्र हे शक्य आहे. यासाठी तुम्ही राईस वॉटर म्हणजे तांदळाच्या Rice पाण्याचा वापर करू शकता. अनेकांच्या घरात दररोज तांदूळ म्हणजेच भात शिजतो. हाच तांदूळ धुवून उरलेलं पाणी किंवा भात शिजत असताना काढण्यात आलेल्या पाण्यामुळे तुमच्या

त्वचेच्या अनेक समस्या दूर होवू शकतात.

तांदळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि माॅइश्चरायझिंग तत्वं आणि इतरही अनेक पोषक तत्व असल्याने तांदळाच्या पाण्याचे त्वचेला अनेक फायदे होतात.

अँटीएजिंगसाठी राइस वॉटर

तांदूळ धुतल्यानंतर किंवा भिजत घातल्यानंतर उरलेल्या पाण्यात तसंच भात शिजवताना पाणी काढलेल्या पाण्यातही मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं आढळतात. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन, फायबर, मॅग्नेशियम आणि मँगनिज सारखी पोषक तत्वं आढळतात. ज्यामुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळतं.

तसंच Rice Water मध्ये व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन इ मुबलक प्रमाणात असल्याने चेहऱ्याचे पोअर्स कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

त्वचा चमकदार होण्यास मदत

तांदळाच्या पाण्यामध्ये उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तांदळातं पाणी एक नैसर्गिक एक्सफोलिएअर म्हणून वापरलं जातं. यामुळे त्वचेवर चमक येण्यास मदत होते. दक्षिण पूर्वेकडील आशियायी देशांमध्ये तांदळाच्या पाण्याचा त्वचेसाठी वापर केला जातो. यामुळेच इथल्या लोकांच्या त्वचेवर कायम ग्लो दिसतो.

पिंपल्सची चिंता मिटेल

पिंपल्समुळे अनेकजण कायम त्रस्त असतात. यासाठी विविध उपाय केले जातात. ज्यावर मोठा खर्च होतो. मात्र त्याएवजी चेहऱ्याला नियमितपणे तांदळाचं पाणी लावल्यास पिंपल्सची Pimples समस्या सहज दूर होईल.

तांदळाच्या पाण्यातील स्टार्चमुळे त्वचेच्या छिद्रांमधील अतिरिक्त सिबम आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते. खास तरून तेलकट त्वचा आणि चेहऱ्यावर मोठ्या पिंपल्सची समस्या असल्यास तांदळ्याचा पाण्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

नैसर्गिक सनस्क्रिन

तांदळाचं पाणी हे एका प्रकारचं नैसर्गिक सनस्क्रिन म्हणून काम करतं. यामुळे सुर्याच्या किरणांमुंळे त्वचेचं होणारं नुकसान कमी होतं आणि चेहऱ्याला शांत आणि गारवा मिळतो.

तसंच तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचं यूव्ही किरणांपासून संरक्षण होतं. चेहऱ्यावरील लालसरपणा, तसंच डाग आणि सूज कमी होण्यास मदत होते. तांदळाच्या पाण्याचा वापर करून उन्हामुळे झालेली टॅनिंग दूर होते.

असा करा राइस वॉटरचा वापर

राइस वॉटर क्लिंजर म्हणूनही काम करतं यासाठी तांदूळ भिजत घातल्यानंतर पाणी गाळून घ्यावं. एका कापसाच्या बोळ्याने हे पाणी संपूर्ण चेहऱ्याला लावून ५ मिनिटांनी चेहरा धुवा.

तुम्ही एकदाच राइस वॉटर तयार करून ठेवू शकता. यासाठी एका वाडग्यात एक वाटी तांदूळ घ्या. हे तांदूळ स्वच्छ धुवा. त्यानंतर त्यात १ ग्लास पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवा, दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा.

बॉटलमध्ये भरलेलं पाणी क्लिंजर किंवा टोनर म्हणून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT