Hair Care Growth Tips Sakal
लाइफस्टाइल

Hair Growth Tips गुडघ्यापर्यंत लांबसडक केस हवे आहेत? तर या पानांच्या तेलाचा करा वापर

Hair Growth : हेअर केअर रूटीनमध्ये या तेलाचा समावेश केल्यास केसांची वाढ झटपट होण्यास मदत मिळेल. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

सकाळ डिजिटल टीम

Hair Care :केसगळती रोखण्यासाठी बहुतांश जण अनेक घरगुती उपाय करून पाहतात. विशेषतः महिलावर्ग केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तेलाचा वापर करतात. पण तेलामध्ये औषधी गुणधर्म असल्यासच केसांना फायदे मिळातील व केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळतील.

तुम्ही देखील लांबसडक केस मिळवण्याकरिता वेगवेगळे उपाय करून थकले आहात का? मग चिंता करू नका. या लेखाद्वारे आपण अशा एका औषधी तेलाची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल. 

आपण हेअर केअर रूटीनमध्ये रोझमेरीच्या तेलाचा (Rosemary Oil) समावेश करू शकता. या तेलामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत आणि हे तेल हेअर फॉलिकल्ससाठीही फायदेशीर आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

केसांच्या वाढीसाठी वापरा रोझमेरी ऑइल (Rosemary Oil For Hair Growth )

रोझमेरी तेलाच्या वापरामुळे (Rosemary Essential Oil) डोक्याच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि यामुळे केसगळतीची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळते. रोझमेरी तेलाच्या वापरामुळे टाळूच्या त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होऊ शकतात. यामुळे केसांमध्ये कोंडा होणे व डोक्याला खाज येण्याची समस्या कमी होऊ शकते. 

रोझमेरी तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे केसांचे संरक्षण होते. रोझमेरी ऑइल अन्य दुसऱ्या तेलामध्ये मिक्स करून लावले जाते. हवे असल्यास आपण रोझमेरी ऑइल नारळाचे तेल किंवा जोजोबा ऑइलमध्ये मिक्स करून लावू शकता. थोडा वेळ केसांचा मसाज करा आणि त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

रोझमेरीच्या पानांचे पाणी देखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रोझमेरीची पाने पाण्यामध्ये उकळा आणि यानंतर पाणी थंड होऊ द्यावे. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि स्प्रेच्या मदतीने केसांवर लावा. स्प्रे बॉटल नसल्यास कापसाच्या मदतीने केसांना हे पाणी लावावे आणि थोड्या वेळाने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

या गोष्टी लक्षात ठेवा

  • केसांना जास्त प्रमाणात रोझमेरीचे तेल लावून नये. त्याचे केवळ काही थेंबच केसांसाठी पुरेसे असतात.

  • रोझमेरीचे तेल डायल्युट न करता थेट केसांवर लावू नये. 

  • केसांवर रोझमेरी ऑइल लावण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट नक्की करून पाहा. पॅट टेस्टमुळे त्वचेशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्यास या तेलाचा वापर करू नये. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Dahi Handi 2025 : जिथं जय जवान पथक कोसळलं, तिथंच कोकण नगर पथकानं रचला 10 थरांचा इतिहास; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही केलं कौतुक

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

Irfan Pathan : धोनीने मला संघाबाहेर ठेवलं...! इरफान पठाणने सांगितला २००९ चा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने रचला २०२५ मधील पहिला १० थरांचा विश्वविक्रम

'आयुष्यात सगळंच अवघड होऊन बसलय' गोविंदाची पत्नी मंदिरात मोठमोठ्याने रडली, पण नक्की झालं काय?

SCROLL FOR NEXT