hair care tips news sakal
लाइफस्टाइल

शॅम्पू नव्हे तर या नैसर्गिक उपचारांनी करा हेअर वॉश, केसांसह स्कॅल्पही होईल चांगले स्वच्छ

Hair Wash: घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या कित्येक नैसर्गिक सामग्रींपासून हेअर वॉश केले जाऊ शकते. यामुळे स्कॅल्पची स्वच्छता होतेच शिवाय केसांचंही सौंदर्य वाढते.

सकाळ डिजिटल टीम

Hair Care Tips In Marathi : केसांवर केमिकलयुक्त ट्रीटमेंट करणे बहुतांश जणांना आवडत नाही. ही मंडळी शक्य होईल तितक्या नैसर्गिक सामग्रींनी केसांची निगा राखण्याचा प्रयत्न करतात. आपल्या हेअर केअर रूटीनमध्ये जितक्या नैसर्गिक उपचारांचा समावेश असतो, तितके केस मुळासकट मजबूत, घनदाट व काळेभोर राहतात. 

पण धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे काही जणांना शक्य होत नाही. त्यामुळे केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर इत्यादी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. बऱ्याचदा अयोग्य शॅम्पूच्या वापरामुळे केसांचं नुकसान होते. 

हे नुकसान टाळायचे असेल तर शॅम्पूऐवजी काही नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचार करून पाहा. घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रींपासून केसांची काळजी कशा पद्धतीने घेतली जाऊ शकते, पाहुया सविस्तर माहिती…

केसांसाठी नॅचरल शॅम्पू l Natural Shampoo For Hair Wash 

मुलतानी माती 

चिकट आणि तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास, यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर करू शकता. केस व टाळूवर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी मुलतानी माती म्हणजे प्रभावी उपाय. 

केस धुण्यासाठी मुलतानी मातीचा एक तुकडा पाण्यात भिजत ठेवा. माती विरघळल्यानंतर केसांवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.    

शिकेकाई, आवळा आणि रीठा 

केसांच्या काळजी घेण्याकरिता शिकेकाई, आवळा आणि रीठा यांचा विविध प्रकारे वापर केला जाऊ शकतो. या आयुर्वेदिक सामग्रींमुळे केसांना भरपूर फायदे मिळतात. शिकेकाई, आवळा आणि रीठा समप्रमाण एकत्रित करा व पाण्यात उकळा. पाणी घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. हे पाणी काही वेळासाठी थंड होऊ द्यावे. यानंतर याच पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

नारळाचे दूध  

कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास नारळाच्या दुधाच्या केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. नारळाच्या दुधाच्या वापरामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो. तसंच टाळूवर जमा झालेली घाण देखील स्वच्छ होते. नारळाचे दूध केसांवर तासाभरासाठी लावून ठेवा आणि यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

दूध आणि मध 

दूध आणि मध एकत्रिक केसांवर लावल्यास केस मऊ होतात. एका वाटीमध्ये मध आणि दूध एकत्रित घ्या व नीट मिक्स करा. हे मिश्रण केसांवर 20 मिनिटांकरिता लावून ठेवा व यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची संलग्नता रद्दच, याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Pune News: आमच्या हद्दीत कारवाई करायची नाही; आरटीओ अधिकाऱ्याची निरीक्षकाला धमकी, ऑडिओ व्हायरल, परिवहनमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Monsoon Update : चिंता वाढली ! मान्सूनचा प्रवास आणखी रखडला, आता 'या' तारखेला मुंबईसह राज्यात होणार दाखल; हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

Kolhapur Irrigation Department : कोल्हापूर पाटबंधारे विभागाचा शेतकऱ्यांना दणका, दहा नद्यांना उपसाबंदीचे आदेश; अनिधिकृत उपसा केल्यास थेट कारवाई

Tadoba Safari: पर्यटकांसाठी खुशखबर! ताडोबा, पेंचसह सर्व व्याघ्र प्रकल्पांतील कोअर सफारी ३० जूनपर्यंत सुरू, नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT