Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : डबल चीनमुळे लुक खराब होतोय? या टिप्स नक्की फॉलो करा

डबल चीन किंवा मानेवरील फॅट्स तुमचा लुक खराब करतात. अशावेळी हे योगासनं उपयुक्त ठरतात.

धनश्री भावसार-बगाडे

Yoga To Reduce Face and Neck Fats : परफेक्ट जॉ लाइन मिळावी, डबल चीन दिसू नये म्हणून महिला बऱ्याच धडपडत असतात. पण लहान किंवा जाड, लाइन्स पडलेली मान तुमचे सौंदर्य बिघडवते. जर तुम्हाला यातून मुक्ती मिळवायची असेल तर काही योगासनं तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

विशेष म्हणजे हे करण्यासाठी खास वेळ काढत बसण्याची गरज नाही. हा फेशियल योग तुम्ही कोणतेही काम करत असताना करू शकतात.

लायन पोझ / सिंह मुद्रा

या मुद्रेमुळे मानेवर जमा झालेली डबल चीन, फॅट्स काढून टाकण्यास मदत मिळते. यासाठी शक्य तेवढी जीभ बाहेर काढा. घशातून सिंहासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे मानेच्या मज्जा तंतूंवर ताण निर्माण होऊन तेथील फॅट्स कमी होण्यासम मदत मिळेल.

भुजंगासन

या आसनाने केवळ शरीराची मुद्रा सुधारण्यासच मदत होत नाही तर मानेचे स्नायूपण ताणले जातात. त्यामुळे मानेवरच्या रेषा, चरबी कमी होण्यास मदत होते.

उष्ट्रासन

योगासन केल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि त्यांच्यात ताण जाणवतो. त्यामुळे शरीर सडपातळ आणि घट्ट होते. यामुळे पोटाची आणि मानेवरची चरबी कमी होते.

नेक रोल

खांदे एका जागी स्थीर ठेवून मान फिरवा. त्यात जाणवणाऱ्या ताणाकडे लक्ष द्या. यामुळे डबल चीन आणि मानेची चरबी कमी होते.

नेक स्ट्रेच व्यायाम

यात पाठीवर झोपून फक्त मान उंचवावी. डोके जमीवरच हवे. नंतर श्वास सोडत पूर्वस्थितीत यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT