Beetroot  sakal
लाइफस्टाइल

Beetroot For Skin: त्वचेसाठी बीटरूट उत्तम! हे उपाय नक्की करून बघा

आपली त्वचा नेहमी ग्लो करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Aishwarya Musale

आपली त्वचा नेहमी ग्लो करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक सर्व प्रकारचे केमिकल बेस्ड प्रोडक्ट वापरतात, तर अनेकांना घरगुती उपाय वापरून त्वचा चमकदार बनवायची असते. मात्र, प्रत्येक वेळी अपेक्षित निकाल मिळणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर मानले जाते.

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असलेले बीटरूट आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी अनेक फायदे प्रदान करते. बीटरूटच्या सेवनाने त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि डाग आणि पिगमेंटेशनच्या समस्या दूर होण्यासही मदत होते. आज आम्ही तुम्हाला बीटरूट त्वचेसाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत.

वृद्धत्व विरोधी गुणधर्म

बीटरूट सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामध्ये लाइकोपीन आणि स्क्वालेन देखील कमी प्रमाणात आहे, ज्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.

गलोविंग स्किन

व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेला चमक येते. बीटरूटचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते.

त्वचेला हायड्रेट ठेवते

बीटरूटमध्ये सुमारे 87 टक्के पाणी असते, जे त्वचा आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी बीटरूटचे सेवन जरूर करा.

तुम्ही बीटरूटचा ज्यूस घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करू शकता, टॅनिंग कमी करू शकता आणि काळ्या वर्तुळांपासून देखील मुक्त होऊ शकता. बीटरूट फेस पॅक तयार करण्यासाठी बीटरूटला खोबरेल तेल, दही आणि कच्या दुधामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. असे केल्याने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT