carrot 
लाइफस्टाइल

आरोग्यवर्धक गाजराचा रस!  'या' 10 शारीरिक तक्रारी होतील कायमच्या दूर

शर्वरी जोशी

शरीराच्या योग्य वाढीबरोबरच निरोगी आरोग्यासाठी आहारात पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळेच अनेकदा डॉक्टरदेखील फळे, पालेभाज्या आणि कडधान्य यांचं जास्तीत जास्त सेवन करण्याचा सल्ला देतात. मात्र, बऱ्याचदा लहान मुले किंवा काही वेळा मोठी माणसेदेखील फळे खाण्याचा कंटाळा करतात. अशा परिस्थितीत फळांची फारशी आवड नसणाऱ्यांना फळांचा रस देणं कधीही फायदेशीर ठरु शकतं. विशेष म्हणजे आता फळांसोबतच गाजर, बीट अशा अनेक कंदमुळांपासूनदेखील ज्युस तयार केले जातात. गाजरापासून तयार केलेल्या रसाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे गाजराच्या रसाचं सेवन केल्यामुळे नेमके कोणते शारीरिक फायदे होतात ते जाणून घेऊयात.

गाजराचा रस पिण्याचे फायदे
१. गाजराच्या रसाचे दररोज सेवन केल्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
२. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होतात.
३. डोळ्यासाठी फायदेशीर.
४. शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.
५. पचनक्रिया सुधारते.
६. हृदयाशी निगडीत समस्यांवर गुणकारी.
७. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
८. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
९. हिरड्या मजबूत होतात. तसंच हिरड्यांमधून येणारं रक्त थांबतं.
१०. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

कसा तयार कराल गाजराचा रस?
गाजराचा रस तयार करण्यासाठी प्रथम दोन गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या. त्यानंतर या गाजरांचे बारीक तुकडे करुन ते मिक्समध्ये टाका. त्याच्यासोबतच एक लहानसा आल्याचा तुकडा, एक चमचा लिंबाचा रस, जिऱ्याची पूड आणि थोडंसं चवीनुसार काळं मीठ आणि साधं मीठ टाका. त्यानंतर यात थोडंसं पाणी टाकून हे सारं जिन्नस एकत्र वाटून घ्या. गरजेनुसार, यात थोडं थोडं पाणी टाका. आपल्या गरजेप्रमाणे या गाजराचा रस तयार झाल्यावर तो गाळून घ्या.

नेमकं कधी कराल गाजराच्या रसाचं सेवन?
शक्यतो सकाळच्या वेळी गाजराच्या रसाचे सेवन करावे. तसंच काहींना सकाळी शक्य नसेल तर दिवसातून कोणत्याही वेळी या रसाचे सेवन केलं तरीदेखील चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT