Summer Hydrating Drinks  esakal
लाइफस्टाइल

Summer Hydrating Drinks : उन्हाळ्याची लागली चाहुल, ताक, लस्सीचे फायदे घ्या जाणून

Summer Hydrating Drinks : उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे तहानही भरपूर लागते. ऊन्हाळ्यात ताक, दही, लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात.

सकाळ वृत्तसेवा

Summer Hydrating Drinks : उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे तहानही भरपूर लागते. उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी प्यावी असा सल्ला तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात इतर पॅकबंद पेयांच्या तुलनेत ताक हे स्वस्त, परवडणारं आणि आरोग्यदायी आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

ही पातळी संतुलित ठेवण्यासाठी ताकाचे सेवन करण्यास डॉक्टर सांगतात. त्यात इलेक्ट्रोलाइट्स जसे की पोटॅशियमची उत्तम मात्रा असते. यामुळे शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते. शरीरातील मज्जातंतूच्या बांधणीसाठी तसेच हाडे आणि त्वचेसाठी प्रोटीनयुक्त ताक फायदेशीर असते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक आवर्जून प्यावे.

ताक पिण्याचे फायदे :

  • ताक प्यायल्याने पचनशक्ती सुधारते.

  • ताकात आम्लयुक्त गुणधर्म असल्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. नियमित सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारखे पोटाचे अनेक आजार कमी होऊ शकतात.

  • ताक प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो.

  • ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

  • फार चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर ताक प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासही ताक फायदेशीर आहे.

  • नियमित ताकाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.

  • ताक प्यायल्याने उन्हाळ्यात शरीर ठंड राहते.

असे बनवा ताक, ठरेल जास्त फायदेशीर

दोन वाट्या दही घ्या. बारीक कापलेली एक लहान मिरची, कोथिंबीर, एक चिमूट साखर, १ लहान चमचा काळे मिरे पूड आणि चवीसाठी कढीपत्ता दह्यात घालून हे दही मिक्सरमधून काढून घ्या. त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर हे द्रव मिश्रण एका ग्लासमध्ये ओतून उन्हाळ्यात किंवा एरवीही वरून कोथिंबीर घालून तुम्ही याचा मनसोक्त आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

ताकामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहाते. घरी बनवलेल्या ताकामध्ये घातलेल्या मिठात इलेक्ट्रोलाइट्स असतात. ज्यामुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहाते. तर ताकात घातलेल्या साखरेने उर्जा प्राप्त होते. शिवाय ताकात प्रोबायोटिक तत्व असतात. उत्तम पचकनक्रियेसाठी घरी बनवलेल्या ताकाचे सेवन करावे.

- डॉ. अभिजीत देशमुख, पोटविकार तज्ज्ञ, विवेका मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT