Hair Serum Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Serum Tips : हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती ? केसांना होणारे ‘हे’ फायदे घ्या जाणून

हेअर सीरमच्या वापरामुळे केस मऊ होतात आणि केसांना एक प्रकारची छान चमक येते.

सकाळ डिजिटल टीम

Hair Serum Tips : केसांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक छान लूक येतो. केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली नाही की, केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे, केसांना वेळेवर तेल लावणे, केसांना कंडिशनर लावणे आणि केसांना सीरम लावणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

हेअर सीरम म्हणजे एक प्रकारचे लिक्विड बेस्ड ट्रीटमेंट आहे. हे हेअर सीरम साधारणपणे तेल आणि सिलिकॉन यांना एकत्र करून बनवलेले असते. हेअर सीरम लावल्याने केसांवर एक सुरक्षित लेअर तयार होतो. ज्यामुळे, केसांमध्ये गुंता होण्यापासून केसांना रोखले जाते.

शिवाय, हेअर सीरमच्या वापरामुळे केस मऊ होतात आणि केसांना एक प्रकारची छान चमक येते. त्यामुळे, हेअर सीरमचा वापर केसांवर अवश्य करायला हवा. हेअर सीरम लावण्याची पद्धत नेमकी काय आहे ? आणि हेअर सीरम केसांना लावण्याचे फायदे कोणते ? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत काय आहे ?

हेअर सीरम केसांवर लावल्याने केसांचे प्रदूषणापासून ही संरक्षण केले जाते. केस धुतल्यानंतर केस चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. त्यानंतर, केसांवार तुम्ही हेअर सीरमचा वापर करा. केस धुतल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देखील तुम्ही हेअर सीरम केसांवर लावू शकता.

हेअर सीरम केसांवर लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हेअर सीरमचे ४-५ थेंब केसांवर लावा. हेअर सीरम चुकूनही स्काल्पवर (टाळू) लावू नका. स्काल्पवर हेअर सीरम लावले तर तुमचे केस तेलकट दिसू शकतात.

त्यामुळे, हेअर सीरमचे थेंब केसांना लावा. केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत हे सीरमचे थेंब लावा. सीरम लावल्यानंतर तुम्ही केस छान प्रकारे सेट करून घेऊ शकता. तुम्हाला हवी ती स्टाईल केसांवर करू शकता.

शॅंम्पू आणि कंडिशनरप्रमाणे हेअर सीरम केसांमध्ये दिवसभर राहते. कोणतेही हेअर स्टायलिंगचे उत्पादन केसांवर लावण्यापूर्वी हेअर सीरम आठवणीने लावा. लक्षात ठेवा, न धुतलेल्या केसांवर हेअर सीरम अजिबात लावू नका.

हेअर सीरम केसांना लावण्याचे फायदे कोणते ?

  • केसांमध्ये होणारा गुंता सोडवण्यास मदत करते

  • निस्तेज केसांना छान चमक येते.

  • खराब झालेल्या केसांना संरक्षण देते.

  • केसांना हेल्दी लूक मिळवून देते.

  • कोरड्या आणि कलर केलेल्या केसांना हायड्रेट करण्याचे काम करते.

  • धूळ, प्रदूषण आणि केमिकल्सपासून केसांचे रक्षण करण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT