Benefits Of Makarasana  Sakal
लाइफस्टाइल

Makarasana Benefits: मकरासन मानसिक ताण करतो कमी, जाणून घ्या पद्धत अन् फायदे

Benefits Of Makarasana: मकरासन हा योग पोटावर झोपून केला जातो. यामुळे पोटासंबंधित अनेक आजार दूर होतात.

Puja Bonkile

benefits of makarasana avoid mental stress know methods

आजकालच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे सांधे, स्लिप डिस्क आणि पाठदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. हे आजार कमी करण्यासाठी मकरासन योग खूप उपयुक्त आहे.

मकरासन पोटावर झोपून केले जाते. हा योग करणे खुप सोपे आहे. नियमितपणे सकाळी मकारासन केल्यास अनेक आजार दूर राहतात. तसेच शरीर आणि मन पूर्णपणे शांत राहते. मकरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेऊया.

  • मकरासन करायची योग्य पद्धत कोणती

मकरासन करताना सर्वात आधी पोटावर झोपावे. दोन्ही हात कोपरात वाकवून हनुवटी दोन्ही हातांच्या मध्यभागाच्या खोलग्यात घ्यावी. दोन्ही हाताचे कोपरे जमिनीवर टेकवत एकमेकांना चिकटून घ्यावी.श्वास आत ओढून पाय क्रमश: प्रथम एक एक व नंतर दोन्ही गिडघ्यांना दुमडावे व पायाच्या टाचा नितंबाला लावाव्यात. श्वास सोडत पाय खाली सरळ करावेत.

  • दुसरी पद्धत

मकरासन करताना सर्वात आधी पोटावर झोपावे. दोन्ही हात कोपरात वाकवून दोन्ही तळहात एकमेकांवर ठेऊन तळहात जमिनीवर ठेवा.नंतर त्यावर कपाळ टेकवून विश्रांती घ्यावी.

  • कालावधी

सुरूवातीला ५ वेळा आणि नंतर वाढवित १०- १५- २० मिनिटांपर्यंत करावे.

  • मकरासन करण्याचे फायदे

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास हा योग करावा.

मानसिक ताण

मकरासन केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते.

निद्रानाश

निद्रानाशाची समस्या असलेल्या लोकांनी मकरासन करावे. यामुळे शांत झोप लागते.

नैराश्य

मकरासन केल्याने नैराश्य कमी होते.

पाठदुखी

मकरासन केल्याने पाठदुखीची समस्या कमी होते.

वजन नियंत्रणात राहते

मकरासन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

  • मकरासन करताना कोणती काळजी घ्यावी ?

कंबर, पाठ आणि मानेमध्ये खूप दुखत असेल तर हा योग करू नका.

शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत झाल्यास करणे टाळावे.

तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हा योग करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT