लाइफस्टाइल

Soaked Anjeer Benefits: उच्च रक्तदाब ते मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे अंजीर; जाणून घ्या इतर फायदे

अंजीर खाल्ल्यास शरीराला होतात हे फायदे...

Aishwarya Musale

हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करणे खूप गरजेचे आहे. अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा जे बदलत्या हवामानातही शरीराला आजारांपासून दूर ठेवतील. अंजीर हे ड्राय फ्रुट आहे जे हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते.

अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. हे भिजून खाल्ल्यास त्याचे फायदे तीन-चार पटीने वाढतात. जाणून घेऊया हिवाळ्यात भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे.

बद्धकोष्ठता

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी भिजवलेले अंजीर रामबाण औषधापेक्षा कमी नाही. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार दूर राहतात.

मधुमेह

भिजवलेले अंजीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अॅब्सिसिक अॅसिड, मॅलिक अॅसिड आणि क्लोरोजेनिक अॅसिड आढळतात ज्यामुळे साखरेची पातळी राखण्यास मदत होते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंजीरचा आहारात समावेश करा.

रक्तदाब

भिजवलेले अंजीर रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असते जे रक्तदाब पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे. अंजीरचा आहारात समावेश करा.

मजबूत हाडे

हाडे मजबूत करण्यासाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

निरोगी त्वचा

अंजीर त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर खाल्ल्याने त्वचेला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि त्वचेशी संबंधित आजार दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

SCROLL FOR NEXT