Best Diwali Gift Idea eSakal
लाइफस्टाइल

Diwali Gift Ideas : सोनपापडीच नव्हे, मिठाईचा बॉक्सच टाळा! त्याच किंमतीत प्रियजनांना गिफ्ट करा खास गॅजेट्स

Best Diwali Gift : दिवाळीला एकमेकांना गिफ्ट देण्याची आपली परंपराच आहे.

Sudesh

दिवाळी सणाला लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. यामध्ये सर्वात जास्त वाटा हा मिठाईंच्या बॉक्सचा असतो. त्यातल्या त्यात कित्येक जण सोनपापडीचा बॉक्स म्हटलं की तोंड वाकडं करतात. यामुळेच तुम्ही जर कोणाला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर मिठाईचा बॉक्स हा पर्यायच रद्द करणं उत्तम. त्याऐवजी तुम्ही तेवढ्याच किंमतीत चांगले गॅजेट्स इतरांना गिफ्ट करू शकता.

इअर बड्स

वायरलेस हेडफोन्समध्ये इअर बड्स हा सध्या सर्वात जास्त फेमस असणारा प्रकार आहे. बेसिक इअर बड्स तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर आरामात मिळू शकतात. साधारणपणे 700 ते 1,000 रुपये किंमतीत चांगले बड्स मिळू शकतात.

ब्लूटूथ स्पीकर

गाणी ऐकण्याची आवड बहुतांश लोकांना असते. या दिवाळीला तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लूटूथ स्पीकर गिफ्ट म्हणून देऊ शकता. झेब्रॉनिक्स, मिव्ही, अमेझॉन बेसिक्स अशा कंपन्यांचे ब्लूटूथ स्पीकर साधारणपणे 500 ते 700 रुपयांच्या रेंजमध्ये मिळू शकतात.

स्मार्टवॉच

आपल्या आसपास कित्येक हेल्थ कॉन्शिअस लोक असतात. त्यांना गिफ्ट म्हणून मिठाईचा बॉक्स देण्याऐवजी एखादं स्मार्टवॉच तुम्ही गिफ्ट करू शकता. अर्थात, यासाठी तुम्हाला तुमचं बजेच 1,000 रुपयांपेक्षा जास्तच ठेवावं लागेल. साधारणपणे 2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला चांगली स्मार्टवॉच मिळू शकेल.

ड्रायफ्रूट्स

मिठाईच्या किंमतीमध्येच तुम्ही हेल्दी गिफ्ट देखील देऊ शकता. कित्येक दुकानांमध्ये छान पॅक केलेले ड्रायफ्रूट्सचे कॉम्बो देखील मिळतात. असे गिफ्ट दिल्यास ते नावाचं स्टिकर बदलून पुढे पाठवले जाण्याची शक्यता कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT