Best Food For Fertility esakal
लाइफस्टाइल

Best Food For Fertility : मूल होत नाहीये? फर्टिलिटी वाढवण्यासाठी या गोष्टींची नक्कीच होईल मदत

आपण फर्टिलिटी वाढवणाऱ्या काही गोष्टींची माहिती जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Best Food For Fertility: जोडप्याच्या आयुष्यात आई-बाबा होण्याचं सुख त्यांच्या साठी महत्वाचं असतं. विशिष्ट वय झालं की जोडपे फॅमिली प्लानिंग करतात. मात्र काहींना प्रयत्न करूनही कंसिव करण्यात बऱ्याच समस्या येतात. इनफर्टिलीसाठी बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. आज आपण फर्टिलिटी वाढवणाऱ्या काही गोष्टींची माहिती जाणून घेऊया.

इनफर्टिलीटीसाठी बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. तुमची इरेग्युलर लाइफस्टाइल, स्पर्म काउंट कमी होणे, खराब क्वॉलिटीचे एग्ज या सगळ्या गोष्टी यास जबाबदार असतात. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनच्या मते, प्रत्येक ५ व्यक्तींमध्ये एका व्यक्तीस कंसिव करण्यास समस्या येतात. तेव्हा तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही चेंजेस करा. (Fertility Rate)

एका स्टडीमध्ये असे सांगण्यात आले आहे की तुम्ही कंसिव करण्याचा निर्णय घेतला असाल तर डेअरी आणि ग्लुटिनयुक्त पदार्थ खाणे टाळायला हवे. नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सार्डिन मासे - या माशात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि हाय क्वॉलिटी प्रोटीनसह असे अनेक पोषक तत्व दिसून येतात. एका स्टडीमध्ये असे सांगितले गेलेय की सार्डिन मासे खाल्ल्याने कंसिव करणे सोपे जाते. हे खाल्ल्याने पुरुष आणि स्त्रियांमध्ये इनफर्टिलीटीच्या समस्या कमी होतात. (Women Problems)

फुल फॅट दूध - कंसिव करतावेळी अनेक डेअरी प्रोडक्ट्सला योग्य मानले जात नाही. त्याने शरीरात जळजळ वाढते आणि त्यावेळी कंसिव करण्यास समस्या निर्माण होतात. मात्र स्टडीनुसार, काही बाबतीत हे सूजन कमी करण्यासही मदत करते.

ओट्स - ओट्समध्ये विटामिन बी, आयरन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. तेव्हा ज्या महिल कंसिव करण्याचा प्लान करत असेल त्यांच्यासाठी ओट्स फायदेदायी ठरते. (Male Fertility)

टमाटर - पुरुषांनी इनफर्टिलिटीची समस्या दूर करण्यासाठी टमाटर खावे. यात इनफर्टिलिटी दूर करणारे अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्याला लायकोपिन असं म्हणतात. पुरुषांनी कच्चे टमाटर खाण्याऐवजी टमाटरला शिजवून खा.

अक्रोड - २०१९ मध्यील एक डेटामध्ये पुरुषांची इनफर्टिलिटीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी जवळपास ३ महिने ४२ ग्रॅम अक्रोडचं सेवन करावे. अक्रोडच्या नियमित सेवनाने स्पर्मच्या गुणवत्तेत सुधारणा होते. अक्रोडमध्ये प्लांट बेस्ड प्रोटीनसह ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अनेक पोषक तत्व असतात. अक्रोडने पुरुषांसह महिलांमधील इनफर्टिलिटीच्या समस्या दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषदेत ७३ पैकी ३७ जागांवर विजय! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Zilla Parishad Election Result: संभाजी नगरमध्ये पुन्हा एमआयएमची चमक; जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळाल्या?

Satej Patil Kolhapur : कंप्लीट धुरळा! राज्यातील पहिली सर्वात तरूण उमेदवार कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सोनाली पाटील विजयी, गगनबावड्यात सतेज पाटलांनी गड राखला

Dharashiv ZP Election Result : एका मताचे महत्त्व ! ढोकीमध्ये ठाकरे सेनेच्या अमर समुद्रेंचा अवघ्या १ मताने विजय, भाजपच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Patan ZP Election Result : पाटणच्या राजकारणात मोठा उलटफेर; पाटणकरांचा बालेकिल्ला ढासळला, शंभूराज देसाईंचे 'निर्भेळ' यश

SCROLL FOR NEXT