Diwali Vacation sakal
लाइफस्टाइल

Diwali Vacation: दिवाळीला परदेशात सुट्ट्यांचा प्लॅन करताय? 'ही' आहेत बजेट डेस्टिनेशन्स

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाताय? एका क्लिकवर पाहा सर्वोत्तम ठिकाणांची यादी

Aishwarya Musale

दिवाळी हा जगातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे आणि तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दिवाळी हा भारतात 'दिव्यांचा सण' म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या निमित्ताने अनेकदा लोक कुटुंबासोबत फिरण्याचा प्लानिंग करतात. कारण दिवाळीत अनेक सुट्ट्या असतात.

दिवाळी 8 दिवसांवर आली आहे. सुट्टी घेऊन फिरायला कुठे जायचं हा प्लॅन करताय का? परदेशात जाण्याचीही योजना आखताय का? पाहा परदेशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता.

दुबई

दुबई हे एक असे ठिकाण आहे जिचे सौंदर्य प्रत्येकाला जवळून पहावेसे वाटते. इथले चकाचक रस्ते आणि उंच इमारती लोकांना खूप आवडतात. दुबई हे प्रवास आणि गर्दीपासून दूर असलेली प्रसिद्ध वाळवंट सफारी यासाठीही प्रसिद्ध आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच दुबईला जात असाल तर हे ठिकाण तुम्हाला लंडन-पॅरिसपेक्षा कमी नाही. दुबई आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. भारतातून या सुंदर शहरात तुम्ही फक्त 3 तास 35 मिनिटांत पोहोचू शकता.

सिंगापूर

जर तुमचे बजेट खूपच कमी असेल, पण तुम्हाला परदेशी टूरही करायची असेल तर तुम्हाला सिंगापूर खूप आवडेल. तुम्ही विमानतळावरून बाहेर पडताच सुंदर बेट शहर तुम्हाला आनंदित करेल. सिंगापूर जगभरातील बॅकपॅकर्स, फोटोग्राफर, एडवेंचर लवर्स आणि शॉपिंग उत्साही लोकांना आकर्षित करते. हे शहर कुटुंबासह भेट देण्यासाठी योग्य आहे. तुम्ही बेंगळुरूहून सिंगापूरला ४ तास ३० मिनिटांत सहज पोहोचू शकता.

मलेशिया

भारतातून तुम्ही अवघ्या चार तासांत मलेशियाला पोहोचू शकता. एक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन असण्यासोबतच, मलेशिया आपल्या स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही कुटुंबासोबत आलात किंवा काही कामासाठी, मलेशिया तुम्हाला कंटाळा येऊ देणार नाही. चेन्नईहून फ्लाइटने क्वालालंपूर ४ तासांच्या अंतरावर आहे.

थायलंड

बजेट फ्रेंडली यादीमध्ये थायलंडचे नाव येते. थायलंड भेट देण्यासाठी योग्य आहे. आकर्षक नाइटलाइफ, समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ हे असे संयोजन आहे जे तुम्हाला येथे कंटाळा येऊ देणार नाही. भारतातील मोठ्या शहरांमधून तुम्ही येथे स्वस्तात फ्लाइट तिकीट खरेदी करू शकता. येथील फ्लोटिंग मार्केट देखील एकदा पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: संसद मार्गावरील निषेध प्रकरणातील आंदोलक न्यायालयात हजर

Mumbai News: वाय-फाय, चार्जिंग, कॅफे, सोफा… मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर विमानतळासारखे डिजिटल लाउंज उभारणार, कधी सुरू होणार?

Kolhapur Politics : दिवसा नियोजन, रात्री जोडण्या; चंदगडच्या गल्लीगल्लीत निवडणूक तापवणारी गुप्त राजकीय व्यूहरचना!

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT