Hair  sakal
लाइफस्टाइल

Hair Care: केस खूप गळतात, हैराण आहात? रोज करा ही योगासनं, गळती थांबून केस होतील दाट

केस गळण्याची समस्या केवळ महागडे हेअर पोडक्टस वापरुन सुटत नाही.

Aishwarya Musale

पाहिले तर आज प्रत्येक माणूस केसगळतीने त्रस्त आहे. खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे याशिवाय तणाव, झोप न लागणे आणि इतर कारणांचाही वाईट परिणाम केसांवर दिसून येतो. केस झपाट्याने गळण्याव्यतिरिक्त, ते पातळ आणि निर्जीव देखील दिसतात. केस गळायला लागले तर तो एक नवीन ताण बनतो.

तुम्हाला माहिती आहे का की योगाद्वारे तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्यच सुधारू शकत नाही तर त्यांची वाढही सुधारू शकता. आम्ही तुम्हाला अशा 3 योगासनांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे केसांच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

बालायम

काही योगासने अशी आहेत जी ऑफिस, घर, गाडी किंवा कुठेही बसून करता येतात. यापैकी एक बालायम आहे, ज्याचा उल्लेख स्वत: योगगुरू बाबा रामदेव यांनी अनेकदा केला आहे. केस काळे, दाट आणि मजबूत बनवणारे हे आसन करणे खूप सोपे आहे. यासाठी दोन्ही हातांची नखे एकत्र करून घासावी लागतात. हे चांगले परिणाम देते कारण केस गळणे देखील काही दिवसात कमी होते.

पृथ्वी मुद्रासन

केसांची वाढ सुधारण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत रक्ताभिसरण चांगले असणे आवश्यक आहे. पृथ्वी मुद्रासनाद्वारे तुम्ही रक्तप्रवाह सुधारू शकता. सर्व प्रथम पाय आतून दुमडून सरळ बसा आणि नंतर तळवे गुडघ्यावर ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. हे आसन केल्याने तणाव कमी होतो, ज्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या जलद वाढीवर दिसून येतो. हे आसन तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता.

नाडी शोधन प्राणायाम

या आसनात एका नाकपुडीतून श्वास घ्यावा लागतो आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडावा लागतो. पण लक्षात ठेवा की श्वास घेताना किंवा सोडताना एक नाकपुडी बोटाने बंद करावी लागते.

हे आसन करण्यासाठी सरळ बसा आणि नंतर विष्णुमुद्रामध्ये एक हात गुडघ्यावर ठेवा. या आसनामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. कारण ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर केसांची वाढ होत नाही आणि केस लवकर गळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT