yoga sakal
लाइफस्टाइल

Yoga Day 2023: पहिल्यांदाच योगा करणार आहात? चुकूनही या चुका करू नका!

योग किती फायदेशीर आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो.

Aishwarya Musale

ऋग्वेदातही योगाचा उल्लेख असल्याने भारताशी योगाचा खोलवर संबंध आहे. त्याचा इतिहास सुमारे 5000 वर्षे जुना असल्याचे मानले जाते. मानसिक आणि शारीरिक क्रियाकलाप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगाचा उगम भारतात झाला. योगाची प्रभावीता पाहता आज जगभरातील लोकांना त्याचे महत्त्व कळू लागले आहे. योग किती फायदेशीर आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो.

जागतिक योग दिनाला अवघे काही दिवस उरले आहेत. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या पहिल्यांदाच योगा करणाऱ्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत.

फ्रेंडली क्लासेस: जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करणार असाल तर फक्त बिगिनर्ससाठी बनवलेले क्लासेस किंवा व्हिडिओ पहा. येथे अशा अनेक मूलभूत गोष्टी सांगितल्या जातात, ज्या जाणून घेतल्यावर बिगिनर्सही योग्य प्रकारे योग करू शकतात.

रुटीन महत्त्वाची: कोणताही योग किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही ते नियमितपणे कराल हे ठरवा. किंवा त्याचे रूटीन फॉलो करा. त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीरही लवचिक होते. अशा प्रकारे तुम्हीही निरोगी वाटू शकाल.

वॉर्म अप: योगाद्वारे शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवता येतात, परंतु कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी वॉर्म अप आवश्यक आहे. योगा करण्यापूर्वी वॉर्म अप करणे स्नायू आणि सांध्यांसाठी चांगले असते.

तुम्ही योग रुटीन सुरू केली असेल, तर तुमच्या शरीरावर अतिरिक्त भार पडत नाही हे देखील लक्षात ठेवा. व्हिडीओ पाहून योगासने करता येतात, पण नकळत जास्त योगासने केल्यानेही वेदना होतात.

दीर्घ श्वास घ्या: योगासाठी लोकांमध्ये एक समज आहे की योगासन कसे करावे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. परंतु या काळात आपण दीर्घ श्वास देखील घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या सरावाने हृदय व मन शांत होते.

स्वतःची इतरांशी तुलना करू नका: पहिल्यांदाच योगा करणारे स्वतःची इतरांशी तुलना करण्याची चूक करतात. प्रत्येकाचे शरीर आणि क्षमता वेगवेगळी असते. इतरांचे बघून योगासने केल्याने शरीरात वेदना किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. योगासने किंवा इतर व्यायाम सुरू केल्यानंतर, सुरुवातीला ऍक्टिव्हिटी हळूहळू करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT