Home Cooling Tips: Sakal
लाइफस्टाइल

Home Cooling Tips: उष्णतेमुळे घर होतंय गरम? 'या' टिप्स ठेवतील कूल-कूल.. टॉप फ्लोअरला राहत असाल तर नक्की वाचा

Summer Home Cooling Tips: तुम्ही जर टॉप फ्लोअरला राहत असाल तर पुढील कुलिंग टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

उन्हाळ्यात टॉप फ्लोअरला राहणाऱ्या लोकांना अनेकदा कडक उन्हाचा सामना करावा लागतो. कारण छत गरम होते आणि त्यामुळे घरातील तापमानही वाढते. अनेक लोक घर थंड करण्यासाठी कुलर, एसी वापरतात पण पाहिजे तसा थंडावा मिळत नाही. अशावेळी पुढील सिंपल टिप्स फॉलो करून घराच छत थंड करू शकता.

हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट

घराचे छत थंड राहावे यासाठी रिफ्लेक्टिव्ह पेंटचा वापरू शकता. हे विशेष पेंट सूर्याच्या तीव्र किरणांना परावर्तित करते, ज्यामुळे छताची उष्णता कमी होते. यामुळे तुमचे छत जास्त काळ थंड राहते आणि घरातील उष्णताही कमी होते.

इनडोअर प्लांट्स

तुमच्या घरात काही खास झाडे लावा जी हवा शुद्ध करतात. ही झाडे फक्त हवा ताजी ठेवत नाहीत तर घराला थंडावा देतात. यामुळे तुमचे घर थंड राहील.

क्रॉस वेंटिलेशन

सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा बाहेर थंड असते तेव्हा तुमच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या. यामुळे घरातील गरम हवा बाहेर जाईल आणि थंड हवा आत येईल.

वॉटरप्रूफिंग

घरातील छतावर वॉटरप्रूफिंगचा जाड थर लावल्यास थंडावा मिळू शकतो. हा थर पावसाच्या पाण्यापासून छताचे संरक्षण तर करतोच पण उष्णतेपासूनही दूर ठवतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा थर छताला लावल्यास उष्णता कमी होते. यामुळे तुमचे घर आतून थंड राहते.

ग्रीन रूफिंग

तुमच्या छतावर गवत किंवा लहान झाड वाढवू शकता. यामुळे घराचे छत नैसर्गिकरित्या थंड राहते. ही झाडे सूर्याची उष्णता शोषून घेतात, त्यामुळे छताचे तापमान कमी होते आणि घरातील हवाही थंड राहते. अशाप्रकारे तुमचे घर केवळ थंडच राहणार नाही तर वातावरणही हिरवेगार आणि प्रसन्न राहील.

शेड नेट्स

तुमच्या छतावर थेट सूर्यप्रकाश पडत असेल तर छतावर शेड नेट बसवू शकता. या नेटमुळे थेट सूर्यप्रकाश छतावर येत नाही. यामुळे तुमच्या छताचे आणि घराचे तापमान कमी होते आणि उष्णतेपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

विचित्रच! जाहिरातीचं शूटींग अन् खांदा निखळला; स्टार खेळाडू IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, वाढली डोकेदुखी

Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी बातमी! 5 ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT