Bhaubeej 2023 esakal
लाइफस्टाइल

Bhaubeej 2023 : देशातल्या या गावात आहेत भाऊ-बहिणींचे मंदिर, इतिहास अन् प्राचिनता थक्क करणारीच आहे

या मंदिरात जाऊन आशिर्वाद घेतल्याने भावावरील संकट टळते

Pooja Karande-Kadam

Bhaubeej 2023 :

भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. या सणाला बहिणी लाडक्या भावाला ओवाळतात. त्याला काय हवं नको ते पाहतात. त्याला गोडधोड जेवण करून घालतात. भाऊ सुद्धा बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांच्या रक्षणाचे वचन घेतात.

भाऊबीज हा सण रक्षाबंधनासारखाच आहे. या निमित्ताने भाऊ-बहिणींसह सगळा गोतावळा एकत्र जमतो. बहिण-भाऊ काही खास ठिकाणी जाऊन सण अधिक उत्साहात साजरा करू शकतात.  भारतात काही मंदिरे आहेत, जिथे भाऊ आणि बहिणी जाऊ शकतात.

यंदाच्या भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ-बहिणींना अर्पण असलेली काही मंदिरे आपण पाहुयात.

मथूरा

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात भाऊ आणि बहिणीला समर्पित एक मंदिर आहे. हे मंदिर यमराज आणि त्यांची बहीण यमुना माता यांचे आहे. मथुरेच्या प्रसिद्ध विश्राम घाटावर बांधलेल्या या मंदिरात यमराज आणि त्यांची बहीण यमुना मातेची यांची विशेष पूजा केली जाते. भावा-बहिणीने यमुना नदीत स्नान करावे आणि एकत्र मंदिरात जावे, अशी मान्यता आहे.

मथुरा जिल्ह्यात भाऊ आणि बहिणीला समर्पित असलेले मंदिर

बिहार

बिहारमधील सिवानमध्ये भावा-बहिणीचे खास मंदिर आहे. ‘भैया बेहानी’ हे गाव महाराजगंज उपविभागाच्या मुख्यालयापासून ३ किलोमीटर अंतरावर भिखा धरणाजवळ आहे. ५०० वर्षांपासून येथे भाऊ-बहिणीची पूजा केली जाते.

या ठिकाणी एका भावा-बहिणीने समाधी घेतली होती. तिथे दोन वटवृक्ष उगवले आहेत, ज्यांची मुळे कोणालाच माहीत नाहीत. भाऊ-बहिणी येथे वटवृक्षाची प्रदक्षिणा करतात, असे मानले जाते.

भाऊ-बहिणी येथे वटवृक्षाची प्रदक्षिणा करतात

उत्तर प्रदेश

बिजनोरच्या चुडियाखेडा जंगलात भाऊ-बहिणीचे प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की सत्ययुगात एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन माहेरी जात होता, त्या दरम्यान दरोडेखोरांनी दोघांनाही अडवले आणि त्याच्या बहिणीसोबत गैरवर्तन केले.

भावाने आणि बहिणीने देवाकडे संरक्षणासाठी प्रार्थना केली. तेव्हा देवाचा चमत्कार झाला आणि भाऊ-बहिणीचे दगडी पुतळ्यात रूपांतर झाले. आजही त्यांच्या मूर्ती देवी-देवतांच्या रूपात विराजमान आहेत.  

भाऊ-बहिणीचे दगडी पुतळ्यात रूपांतर झाले

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये असलेल्या बन्सी नारायणचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडतात. मात्र, भेट देणार असाल तर या मंदिराला भेट द्या. बंसीनारायणाचे हे चमत्कारी आणि अद्वितीय मंदिर चमोली जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की वामन अवतारातून मुक्त झाल्यानंतर भगवान विष्णू प्रथम येथे प्रकट झाले. या मंदिरात बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते. ज्यामूळे भावाला दिर्घायुष्य मिळते अशी मान्यता आहे.

या मंदिरात बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT