Monsoon Care | Waterfall sakal
लाइफस्टाइल

Monsoon Care : धबधब्यावर जाताना कोणती काळजी घ्याल? वाचा एका क्लिकवर

Monsoon Care : यंदा पावसाळ्यात धबधब्यावर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Care: पावसाळ्यात अनेकांना फिरण्याची आवड असते. तर काहींना धबधब्यावर जाऊन थंडगार पाण्याखाली उभे राहयला आवडते. पण अलिकडेच एक बातमी समोर आली आहे ज्यात लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेले. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार त्यातील तिघांचा मृतदेह मिळाला असून दोघांचा शोध सुरू आहे. यामुळे तुम्हीही मित्रांसोबत किंवा परिवारासोबत धबधब्यावर जाण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

खोलपाण्यात जाऊ नका

पावसाळ्याचा आनंद घेताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खोलपाण्यात जाणे टाळावे. कारण खोल पाण्यात गेल्यावर वाहून जाण्याची शक्यता असते.

मद्यापान करून पण्यात जाऊ नका

धबधब्यावर चुकूनही मद्यपान करून जाऊ नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

निसरडे खडक रत्यावर चालताना काळजी घ्या

धबधब्यावर गेल्यावर खडकावर जाणे टाळावे. तसेच रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी. कारण पाय घसरून दुखापत होऊ शकते किंवा पाण्यात वाहून जाण्याची भिती असते.

धबधब्याच्या प्रवाहात जाऊ नका

धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळावे. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक लोक फोटो काढण्यासाठी धबधब्याच्या प्रवाहात जातात आणि समस्या वाढवून घेतात.

अति उत्सहाता कोणताही निर्णय घेऊ नका

अनेक लोक किंवा पर्यटक अतिउत्साहात धबधब्यावर जातात आणि पाण्यात जाऊन फोटो किंवा व्हिडिओ घेतात. पण असे करू नका.यामुळे पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असते.

अनोळखी ठिकाणी जाऊ नका

पावसाळ्यात फिरायला जाताना अनोळखी ठिकाणांना भेट देऊ नका. कोणत्याही धबधब्यावर जाताना आधी माहिती काढावी आणि मगच जाण्याचा प्लॅन करावा.

नियमांचे पालन करावे

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात सुचना आणि नियम सांगितलेले असतात. त्या नियमांचे पालन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT