लाइफस्टाइल

एक किलो भाजीची किंमत १ लाख रुपये?  जाणून घ्या नेमकं काय आहे कारण

शर्वरी जोशी

वातावरणातील बदलांचा परिणाम थेट पिकांवर होत असतो. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कायम भाजीपाला आणि अन्य खाद्यपदार्थांच्या किंमतीच्या दरात चढ-उतार होत असतात. अनेकदा भाज्यांचे भाव हे कडाडीचे वाढल्याचं पाहायला मिळतं. यात साधारणपणे कांदा, लसूण, टोमॅटो किंवा पालेभाज्या यांचे भाव बऱ्याचदा ३० ते ४० रुपये असल्याचं पाहायला मिळतं. परंतु कधी कोणत्या भाजीचा भाव १ लाख रुपये झाल्याचं ऐकलं आहे का? सहाजिकचं नाही. इतक्या महाग किंमतीत कोणीही भाजी विकत नाही किंवा खरेदी करत नाही. परंतु, सोशल मीडियावर अशाच एका भाजीची चर्चा रंगली आहे. जी चक्क १ लाख रुपये किंमतींना विकली जात आहे. विशेष म्हणजे ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी असल्यामुळे तिची मागणीदेखील वाढत आहे. 

बिहारमधील औरंगाबाद येथे राहणाऱ्या अमरेश सिंह या तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात एक नव्या प्रकारच्या भाजीचं पिक घेतलं आहे. विशेष म्हणजे ही भाजी खरेदी करण्यासाठी १ लाख रुपयाची रक्कम मोजावी लागणार आहे. 

अमरेश सिंह यांनी त्यांच्या शेतात हॉप-शूट्स (hop-shoots) नावाच्या भाजीचं पिक घेतलं आहे. या भाजीचा खासकरुन वापर बिअरच्या फ्लेवरिंगसाठी केला जातो. परंतु, आता या भाजीचा एक नवा गुणधर्म समोर आला आहे.या भाजीचा औषध म्हणूनही वापर करण्यात येऊ लागला आहे.  या भाजीमुळे शरीरात कॅन्सरच्या सेल्स मारल्या जातात. त्यामुळे या भाजीची मागणी वाढली आहे.

कसा करतात या भाजीचा वापर

हॉप कोन्सच्या फुलांचा वापर बिअर करण्यासाठी केला जातो. तर भाजीच्या डहाळ्यांचा किंवा देठाचा वापर भाजी करण्यासाठी केला जातो. आयएएस ऑफिसर सुप्रिया साहू यांनी ट्विटच्या माध्यमातून या भाजीविषयी माहिती दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT