लाइफस्टाइल

Fact Check :  जगातल्या सर्वात महागड्या भाजीचं रहस्य उलगडलं

शर्वरी जोशी

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हॉप-शूट्स (hop-shoots)  या भाजीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगातील सर्वात महागडी भाजी म्हणून या भाजीकडे पाहिलं जात आहे. १ लाख रुपयांना १ किलो मिळणारी ही भाजी बिहारमधील एका शेतकऱ्याने पिकवल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे सोशल मीडियार या भाजीची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, आता या व्हायरल होत असलेल्या भाजीविषयीचं सत्य समोर आलं आहे. त्यामुळे ही भाजी खरंच इतकी महाग आहे का किंवा खरंच हिचं उत्पादन बिहारमध्ये घेण्यात आलं का अशा असंख्य प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत.

'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हॉप-शूट्स (hop-shoots) या भाजीमागील सत्य काही वेगळंच आहे. या भाजीचं उत्पादन बिहारमधील औरंगाबाद येथे घेण्यात येत नसून ज्या शेतकऱ्याने ही भाजी पिकवल्याचं म्हटलं जात होतं. त्या शेतकऱ्याला या सगळ्याची कल्पनाच नसल्याचं समोर आलं आहे. 

बिहार, औरंगाबाद येथील नवीनगरमधील करमडीह गावं येथे राहणाऱ्या अमरेश सिंह यांच्या शेतात झालेल्या हॉप-शूट्स (hop-shoots) या भाजीचं उत्पादन घेतल्याचं म्हटलं जात होतं. या भाजीला आयुर्वेदिक महत्त्व असल्यामुळे ती प्रचंड महाग असल्याचंही सांगण्यात आलं होतं. परंतु, प्रत्यक्षात या शेतकऱ्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी अशा कोणत्याही प्रकारच्या भाजीचं पिक  न घेतल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे अमरेश सिंह हे काळे तांदूळ (Black Rice) आणि गव्हाची शेती करतात.

पाटणामधील काही अधिकाऱ्यांनी हॉप शूट या भाजीविषयी विचारणा केली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात अशा भाजीचं कोणतंही पिक घेतलं जात नाही हे स्पष्ट झालं होतं, असं औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ जोरवाल यांनी सांगितलं

हॉप शूट ही कोणती भाजी?

हॉपशूट या भाजीचं बाराही महिने पिक घेता येतं. ही भाजी खासकरुन उत्तर अमेरिका आणि युरोप या ठिकाणी आढळून येते. या भाजीचा खासकरुन वापर बिअरच्या फ्लेवरिंगसाठी केला जातो. परंतु, आता या भाजीचा एक नवा गुणधर्म समोर आला आहे.या भाजीचा औषध म्हणूनही वापर करण्यात येऊ लागला आहे.  या भाजीमुळे शरीरात कॅन्सरच्या सेल्स मारल्या जातात. त्यामुळे या भाजीची मागणी वाढली आहे. म्हणूनच ही भाजीची ८० हजार ते १ लाखांपर्यंत विक्री केली जाते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT