Bikini Wax Side Effects 
लाइफस्टाइल

सौंदर्याच्या विचित्र कल्पना! पुण्यातील महिला डॉक्टरने सांगितले बिकिनी वॅक्सचे तोटे

नाजुक भागांचं वॅक्स करताना तिथं इजा होण्याची शक्यता असते.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली फक्त चेहऱ्यावरचेच नाही तर संपूर्ण अंगावरचे केस काढणं ही फक्त फॅशन उरलेली नाही तर ट्रेंड झाला आहे. जर तुम्ही वॅक्स, थ्रेडींग नाही केलं म्हणजे तुम्ही गावंढळ आहात असा शिक्का मारला जातो. मग त्यासाठी फुल बॉडी वॅक्स करण्यावर महिला, मुली आग्रह धरतात. Side Effects of Bikini Wax

सर्वात आधी बिकिनी वॅक्स म्हणजे नक्की काय हे माहीत नसलेल्या लोकांसाठी हा काय प्रकार आहे हे समजावून सांगूया.तर मंडळी योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस वॅक्सिंग करून काढून टाकणे जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा बिकिनी वॅक्स चा उद्देश असतो.हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे चांगलेच वेदनादायक असते. (Bikini Wax Hazards)

तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही हे नियमित करून घेतात. यामागे काय कारण असावे? अनेक नाजुक भागांचं वॅक्स करताना तिथं इजा होण्याची शक्यता असते. याविषयी स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी मोलाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया.

त्यांच्याकडे एक मुलगी रडत आली. खास लग्नासाठी म्हणून बिकीनी वॅक्स करताना तिला इजा झाली आणि रक्तस्राव थांबतच नव्हता. त्यावेळी तिला काही टाके घालून तो रक्तस्राव थांबवावा लागला असा अनुभव त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केला आहे. त्यात त्यांनी महिलांना बिकीनी वॅक्स संदर्भात काही मोलाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून त्यांचा हा सल्ला फार महत्वाचा आणि सर्वच महिलांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे.

त्या म्हणतात, स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात.वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जिवाणूंचे वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते.या जिवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकार शक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो.हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा वॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात, दुखावली जातात.

त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात.योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो.परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात. कोरडा पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते तसेच खाज सुटू शकते.ह्या एवढ्या सगळ्या समस्या सगळे केस मुळासकट काढण्याच्या अट्टाहासामुळे होऊ शकतात.

त्यामुळे फक्त पुरुषांना केसविरहित योनी मार्ग आवडतो म्हणून किंवा बिकीनीवर फिरता यावं म्हणून शरीराचे एवढे हाल करून घेणे कितपत योग्य आहे याचा विचार महिलांनी करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT