research begun on blood clots in human body because of Covid nineteen 
लाइफस्टाइल

कशा होतात रक्ताच्या गुठळ्या? जाणून घ्या, कारणे आणि परिणाम

रक्ताच्या गुठळ्या म्हणजे नेमकं काय?

शर्वरी जोशी

बऱ्याचदा ठेच लागल्यावर किंवा मार लागल्यावर संबंधित भागातील रक्त साखळल्याचं आपण पाहतो. मार लागलेल्या ठिकाणी रक्त साचून राहतं आणि तिथे रक्त साखळल्याची खूण राहते. आता मुळात रक्त साखळणं किंवा रक्त गोठणं म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. परंतु, रक्ताच्या गुठळ्या होणं म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? बऱ्याचदा आजारी व्यक्तीकडून शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं ऐकिवात येतं. मात्र, या रक्ताच्या गुठळ्या म्हणजे नेमकं काय हे आपल्या कोणालाच माहित नसतं. त्यामुळेच रक्ताच्या गुठळ्या कशामुळे होतात.किंवा, त्या झाल्यावर त्याचे परिणाम कसे होतात हे जाणून घेऊयात. (blood clots symptoms causes and risk)

रक्ताच्या गुठळ्या म्हणजे काय?

रक्तवाहिनीत रक्ताच्या लहान लहान गुठळ्या तयार होतात. ज्यामुळे रक्तप्रवाह रोखला जातो. खासकरुन या गुठळ्या हृदय व मेंदूला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतं.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणे-

१. ज्या व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारचे आजार आहेत अशा व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण अधिक असतं.

२. ज्या व्यक्तींची शारीरिक हालचाल कमी असते.

३. एखादी दुखापत झाली असल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यास अशा व्यक्तींमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

४. काही रोग असल्यास रक्ताची गुठळ्या होऊ शकतात. शरीराच्या खोल नसामध्ये रक्त गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची लक्षणे

१. सूज

२. तीव्र वेदना

३. कळ येणे

४. शरीराच्या काही भागांना अर्धांगवायू होणे.

(डॉ. चेतन भांबुरे हे मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT