Blue Tea For Weight Loss esakal
लाइफस्टाइल

Blue Tea For Weight : वजन कमी करण्यासाठी इफेक्टीव्ह आहे गोकर्णाच्या फुलाचा चहा, असे करा सेवन

गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेल्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात

सकाळ डिजिटल टीम

Blue Tea For Weight :

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या चहाचे सेवन केले जाते. ग्रीन टी, मसाला टी यांच्यात आता निळ्या चहाची भर पडली आहे. निळ्या रंगाचा चहा हा गोकर्णाच्या फुलांपासून तयार केला जातो. या फुलांचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.

पण आज आम्ही ज्या फायद्याबद्दल सांगणार आहोत. तो वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी ग्रीन टीसारखेच या चहाचे सेवन करावे. ज्यामुळे, त्यांचे वजन कमी व्हायला मदत होणार आहे. (Weight Loss Tips)

काय आहेत या चहाचे फायदे

  • गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला चहा म्हणजेच निळ्या चहाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

  • याचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी तर कमी होतेच पण चयापचय वाढण्यासही मदत होते.

  • गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेल्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

  • या चहाचे सेवन केल्याने चयापचय वाढतो. त्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होते. याचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यासह अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो.

कसा बनवायचा हा चहा

गोकर्णाचा चहा बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. रोज सकाळी एका पातेल्यात 5 ते 6 गोकर्णाची फुले एका ग्लास पाण्यात घालून चांगले उकळा. यानंतर पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते गाळून त्यात लिंबाचा रस किंवा मध टाकून प्यावे. या चहाचे नियमितपणे सकाळी सेवन केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास खूप फायदा होतो. (Healthy Tea Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT