Sushmita Sen Sakal
लाइफस्टाइल

Sushmita Sen Fitness : भारताच्या पहिल्या मिस युनिव्हर्ससारखं फिट व्हायचंय; असा घ्या डाएट

गेल्या काही वर्षांपासून सामान्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वांमध्येच फिटनेसबाबतची क्रेझ वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sushmita Sen Fitness Trend In Bollywood : गेल्या काही वर्षांपासून सामान्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वांमध्येच फिटनेसबाबतची क्रेझ वाढली आहे. वाढत्या वयानुसार प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहे.

हे ही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

फिटनेस ट्रेंडच्या यादीत भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आघाडीवर आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही सुष्मिता सेन तिच्या फिटनेसने बॉलिवूडच्या अनेक तरुण अभिनेत्रींना काटे की टक्कर देत आहे. आज आपण सुष्मीताच्या या फिटनेसमागचं रहस्य आणि तिच्या डाएटबद्दल माहिती सांगणार आहोत.

सुष्मिता सेनचा नेमका आहार काय?

सुष्मिता सेन तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. सुष्मिता तिच्या दिवसाची सुरूवात एक ग्लास कोमट पाण्याने करते. एवढेच नव्हे तर, ती नाष्ट्यापूर्वी ती फळे खाण्यास प्राधान्य देते. न्याहारीसाठी सुष्मिता अंडाच्या पांढऱ्या भागापासून बनवलेले फ्रेंच टोस्टचे सेवन करते. दुपारच्या जेवणात सुष्मिता १ वाटी भात, मसूर, भाज्या, चिकन आणि मासे खाण्यास प्राध्यन्य देते. रात्रीच्या जेवणात सुष्मिताला डाळ रोटी आणि रायता खायला आवडते.

रिंग जिम्नॅस्ट आहे सुष्मिता

सुष्मिता सेन उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम रिंग जिम्नॅस्टदेखील आहे. सुष्मिता अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर रिंग जिम्नॅस्ट करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. अशा प्रकारे जिम्नॅस्टिक केल्याने स्नायूंची ताकद वाढण्याबरोबरच शरीराचा फिटनेस वाढण्यास मदत होते.

वर्क आऊटसाठी या गोष्टींना प्राधान्य

सुष्मिता सेन तिच्या वर्कआउटमध्ये पुश अप्स, योगा आणि काही निवडक व्यायाम करण्याला प्राधान्य देते अनेकवेळा ती सोशल मीडियावर शिरशासन करतानाचे व्हिडिओही शेअर करत असते. फिटनेससाठी सुष्मिता सेन दर आठवड्याला वर्कआउटमध्ये बदल करते. वरील गोष्टींशिवाय सुष्मिता फिटनेससाठी रनिंग, कार्डिओ, स्विमिंग आणि डान्सच्या माध्यमातूनही स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT