Breakfast Recipe esakal
लाइफस्टाइल

Breakfast Recipe : साध्या पोह्यांपेक्षा इंदोरी पोहे कसे वेगळे? जाणून घ्या चटपटीत पोह्यांची सोप्पी रेसिपी

Indori Poha Recipe : इंदोरी पोहे आणि महाराष्ट्रीय पोह्यात काय आहे फरक? इंदोरी पोह्यांसाठीचा जीरावन मसाला कसा बनवाया?

सकाळ डिजिटल टीम

Breakfast Recipe :

पोहे हा भारतातील सर्वात सोपा आणि चविष्ट नाश्ता आहे. महाराष्ट्रात तर नाश्ता म्हणजे पोहे हे समिकरणच आहे. पण आपल्याकडे बनवले जाणारे पोहे अन् उत्तर भारतातील पोहे यात फरक आहे. त्यामुळेच इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत.

इंदोरी पोहे बनवण्याची संपूर्ण रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. इतकंच नाही तर त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा मसाले टाकण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. एवढेच नाही तर ते बनवताना वापरलेली भांडीही वेगळी आहेत. चला तर मग, इंदोरी पोहे कसे बनवायचे ते जाणून घेऊया. (Breakfast Recipe)

इंदोरी पोहे वेगळे कसे?

  • इंदोरी पोह्यांसाठी सर्वात आधी जाड पोहे घ्यावे लागतात. तर सामान्य पोह्यांसाठी पातळ पोहेही चालतात.

  • इंदोरी पोहे भिजवून ठेवावे लागत नाहीत. ते पाण्यात फक्त स्वच्छ धुवून घ्यावे लागतात.

  • हे पोहे वाफवून शिजवले जातात आणि त्यात पोहे कढईच्या आत शिजवले जात नाहीत, तर वर ठेवून शिजवले जातात. म्हणजे कढईत पाणी ठेऊन त्यावर एक मोठे भांडे ठेऊन पाण्यावरील वाफेवर हे पोहे शिजवले जातात.

  • इंदोरी पोह्यात कांदा किंवा वाटाणा वापरला जात नाही. त्यात शेंगदाणे आणि शेव, बडीशेप आणि साखर वापरली जाते.

इंदोरी पोहे कसे बनवावे?

साहीत्य

जाड पोहे, तेल, मोहरी, जीरे, बडिशेफ, हिरवी मिरची, कडीपत्ता, हळद पावडर, हींग, साखऱ, मीठ, दूध, शेंगदाणे,

इंदोरी पोह्यांसाठीचा जीरावन मसाला कसा बनवाया?

जीरावन मसाला बनवण्यासाठी काळे मीठ, हिंग, बडिशेफ, जीरे, धणे, जावित्री, दालचीनी, लाल मिरची आणि तमालपत्र हे मंद आचेवर भाजून घ्या. मसाले थंड झाले की मिक्सरवर त्याची बारीक पावडर बनवा. 

इंदोरी पोहे कसे बनवावे?

  • पोहे स्वच्छ धुवून घ्या. एका कढईत तेल टाका आणि ते गरम झाल्यावर मोहरी,जीरे, बडिशेप, कडीपत्ता आणि बारीक हिरवी मिरची टाका.

  • फोडणी दिल्यानंतर त्यावर हळद टाका. तयार फोडणी पोह्यांवर घाला. आता पोह्यांवर थोड दुध शिंपडा.

  • आता पोह्यात साखर आणि मीठ घाला. आता हातानेच पोहे आणि मसाले मिक्स करून घ्या.

  • यानंतर एका दुसऱ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा. यावर एक मोठी प्लेट ठेवा आणि त्यावर पोहे घाला.

  • आता दुसऱ्या एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या.

सर्व्ह कसे करावेत

इंदोरी पोहे सर्व्ह करण्याची खास पद्धत आहे. सर्वात आधी प्लेटमध्ये पोहे घ्या. त्यावर तळलेले शेंगदाणे आणि जीरावन मसाला टाका. आता वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. यानंतर हिरवी मिरची उभी कापून घाला आणि वरून शेव घाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT