Breakfast Recipe esakal
लाइफस्टाइल

Breakfast Recipe : एका कच्च्या बटाट्यापासून बनवा हा भन्नाट नाश्ता, पोटही भरणार अन् चवदारही होणार!

हा पदार्थ दिसायलाही खुप आकर्षक दिसतो

सकाळ डिजिटल टीम

Breakfast Recipe :

मुलांना मधल्या वेळात खायला काय द्यायचं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पिझ्झा, बर्गर, चाट, भेळ, पाव अशा पदार्थांकडे आपला कल असतो. पण हे चुकीचे आहे. मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना या पदार्थांपासून दूर ठेवणंच जास्त गरजेच आहे.

मग मुलांना द्यायचं काय जे बाहेरून आणल्यासारखे दिसेल अन् पौष्टीकही असेल. तर आज आम्ही कच्चा बटाटा वापरून नाश्त्याला पोट भरणारा पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 

या पदार्थाला तुम्ही रव्याच्या वड्या, रवा ढोकळा ही म्हणू शकता. कारण याची बनवण्याची पद्धत थोडीफार तशी आहे. पण याची चव एकदम वेगळी आहे. ती रेसिपी कशी बनवायची ते पाहुयात.

साहित्य

  • कच्चा बटाटा १

  • रवा १ कप

  • बेसन अर्धा कप

  • मध्यम आकाराचा कांदा

  • टोमॅटो १

  • कोथंबिर आवडीनुसार

  • मीठ

  • पाणी २ कप

  • आवडीनुसार मिरच्या

कृती

  1. कढईत पळीभर तेल घालून जीरे मोहरी मिरची फोडणी, कढीपत्त्याची लसूण फोडणी द्यावी, तसेच यामध्ये तीळ हिंगही घाला.

  2. आता यामध्ये रवा, बटाट्याचे मिश्रण घालून हलवत रहा

  3. आता हे घट्ट होईपर्यंत हलवा. हे थोडेफार उपम्यासारखे दिसायला लागले की गॅस मंद करून परतून घ्या.

  4. आता एका ताट किंवा पातेल्यामध्ये तेल लावून घ्या. यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्या आणि ते थंड होऊ द्या

  5. थंड झालं की ते मिश्रण फ्रिजरमध्ये ठेऊन द्या. आता तुम्हाला हव्या तशा त्याच्या वड्या कापून घ्या

  6. यानंतर पॅनमध्ये तेल टाकून घ्या, त्यावर या वड्या शॅलो फ्राय करून घ्या

  7. गॅस मंदच ठेवा जेणेकरून या वड्या कुरकुरीत होतील

  8. तुम्ही या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT