Bridal Makeup esakal
लाइफस्टाइल

Bridal Makeup : ब्रायडल मेकअपचे नेमके प्रकार किती? लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट बुक करण्यापूर्वी घ्या जाणून

Bridal Makeup : लग्नासाठी तरूणी, दागिने, साड्या, लेहंगा आणि मेकअप लूकची निवड विचारपूर्वक करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Bridal Makeup : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. या महिन्यात आणि पुढील महिन्यात लग्न-साखरपुड्याच्यात तारखा आणि मुहूर्त ही आहेत. लग्नात सर्वाधिक तयारी ही वधूला करावी लागते. अगदी साड्यांपासून ते मेकअपपर्यंत सर्व गोष्टींची छान तयारी करायला तरूणींना आवडते.

लग्नासाठी तरूणी, दागिने, साड्या, लेहंगा आणि मेकअप लूकची निवड विचारपूर्वक करतात. या खास दिवसाचा मेकअप ही खास असावा, असे प्रत्येकीला वाटते. त्यामुळे, या दिवसासाठी मेकअपची निवड करताना तो आपल्या त्वचेला सूट होईल का? आणि तो आपल्यावर कसा दिसेल याचा विचार करूनच मेकअप बुक करावा.

तसेच, सध्या कोणत्या प्रकारचा मेकअप लूक ट्रेंडिगला आहे. हे पाहूनच तुमचा मेकअप लूक सेट करा. आज आम्ही तुम्हाला ब्रायडल मेकअपचे प्रकार कोणते आहेत? त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

एअरब्रश मेकअप

एअरब्रश या मेकअपमध्ये वधूचा मेकअप करण्यासाठी इलेक्ट्रिक-ऑपरेटेड एअरब्रशचा प्रामुख्याने वापर केला जातो. या सर्व गोष्टींमुळे वधूचा मेकअप अतिशय स्मूथ होतो आणि मेकअपमध्ये चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या सुरकुत्या पडत नाहीत. जर तुम्हालातुमच्या लग्नात अशा प्रकारचा एअरब्रश मेकअप करायचा असेल तर तुम्ही या प्रकारचा मेकअप बुक करू शकता.

मिनिमल मेकअप

आजकाल मिनिमल मेकअपला खूप पसंती मिळताना दिसते. बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात या प्रकारच्या मेकअपला पसंती दर्शवल्याचे दिसून आले.

जर तुम्हाला ही लग्नात लाईट मेकअप अर्थात मिनिमल मेकअप हवा असेल तर तुम्ही अभिनेत्री आलिया भट्टच्या मिनिमल मेकअपकडून प्रेरणा घेऊ शकता आणि तुमच्या लग्नात मिनिमल मेकअप बुक करू शकता.

एचडी मेकअप

एचडी मेकअप हा मागील काही वर्षांपासून ट्रेंडला आहे. हा मेकअप लूक करण्यासाठी उच्च दर्जाची उत्पादने वापरली जातात. शिवाय, या मेकअपमुळे तुम्हाला स्मूथ, पारदर्शक आणि डागविरहीत मेकअप लूक मिळतो. त्यामुळे, जर तुम्हाला लग्नात अशा प्रकारचा मेकअप हवा असेल तर तुम्ही एचडी मेकअप नक्कीच बुक करू शकता.

मॅट मेकअप

मॅट मेकअप हा अतिशय वेगळा मेकअप आहे. यामध्ये तुमच्या चेहऱ्याचा मेकअप अशा प्रकारे सेट केला जातो की, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचे फिचर्स वेगळे दिसू लागतात.

शिवाय, हा मेकअप अतिशय लाईटवेट असतो. जर तुम्हाला लग्नात या पद्धतीचा मेकअप हवा असेल तर तुम्ही मॅट मेकअप नक्कीच बुक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT