broccoli  
लाइफस्टाइल

आहारवेद ब्रोकोली; जाणून घ्या ११ गुणकारी फायदे

शर्वरी जोशी

आजकाल प्रत्येक जण  बारीक होण्यासाठी किंवा फीट राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सहाजिकच अनेक जण यासाठी जीम आणि डाएटचा पर्याय निवडतांना दिसतात. यात डाएट करण्यावर अनेकांचा जोर असल्याचं पाहायला मिळतं. अनेक जण डाएट करताना हिरव्या भाज्या, कडधान्य, फळे यांचा आहारात समावेश करतात. विशेष म्हणजे अनेक डाएटिशिअन आणि आहारतज्ज्ञ हिरव्या भाज्यांमध्ये ब्रोकोली खाण्याचा पर्याय सुचवतात. फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकोली केवळ डाएटसाठीच नाही तर अन्य शारीरिक तक्रारींवरदेखील गुणकारी आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटामिन सी, झिंक, कॉपर, प्रोटिन, फायबर, पोटॅशिअम, व्हिटामिन मुबलक प्रमाणात आहेत. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.त्यामुळे ब्रोकोलीचे फायदे कोणते ते आज जाणून घेऊयात.

१. ब्रोकोलीमध्ये असलेले सल्फोराफेन फायटोकेमिकल हे शरीरात टॉक्सिन्सचं काम करते.

२. शरीरावर येणारी सूज कमी होते.

३.  कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखते.

४. हायपरटेन्शनची समस्या असणाऱ्यांनी आहारात नक्कीच ब्रोकोलीचा समावेश करावा.

५. ब्रोकोलीमध्ये अॅटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे.

६. शरीरात असलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

७. मधुमेहींसाठी गुणकारी.

८. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.

९. पचनक्रिया सुधारते.

१०. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

११. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT