Brown Bread sakal
लाइफस्टाइल

Brown Bread Benefits: तुम्ही ब्राऊन बेड खाताय मग ही बातमी तुमच्याचसाठी...

तुम्ही जर ब्राऊन बेड खात असाल तर ब्राऊन बेडचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घ्या.

Aishwarya Musale

आपल्या देशापासून जगभर ब्रेडचा वापर किती प्रकारे केला जातो माहीत नाही. कुणी चहासोबत, कुणी टोस्ट बनवून, जॅम लावून, सँडविचमध्ये, ब्रेड पकोड्यांमध्ये खातात.अशा परिस्थितीत लोक फिट आणि हेल्दी राहण्यासाठी व्हाईट ब्रेडऐवजी अधिक ब्राऊन ब्रेड खाण्यास प्राधान्य देत आहेत.

व्हाईट ब्रेड हा मैदापासून बनवला जातो आणि त्यामुळे फिटनेस फ्रिक ब्राऊन ब्रेड खाण्यास अधिक पसंती देतात, पण यामागे असा प्रश्न पडतो की एवढा आरोग्यदायी पर्याय मानला जाणारा ब्राऊन ब्रेड खरोखरच आरोग्यासाठी तितका चांगला आहे का? सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

व्हाईट ब्रेड रिफाइंड पिठापासून म्हणजेच मैद्यापासून बनवला जातो. गहू आणि इतर अनेक धान्ये मिसळून ब्राऊन ब्रेड बनवला जातो. पौष्टिकतेबद्दल बोलायचे तर त्यात फायबर, कार्बोहायड्रेट, साखर, प्रथिने इ. हे सर्व त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते

आरोग्यासाठी ब्राऊन ब्रेड

ब्राऊन ब्रेडला आरोग्यदायी मानले जाते, परंतु काहीवेळा त्यात मैदा, कलर, साखर आणि इतर अनेक प्रिजेवेटिव देखील असू शकतात. म्हणजेच बाजारात ब्रेडचा नुसता कलर पाहून खरेदी करू नका, तर मोठ्या आणि नावाजलेल्या ब्रँडचा ब्राऊन ब्रेड घेण्यापूर्वी त्याच्या पॅकेटच्या मागील बाजूस लिहिलेले पदार्थ नक्की वाचा. कारण कधी-कधी हे ब्रेड तुमच्या आरोग्यासाठी व्हाईट ब्रेड म्हणजेच मैद्याच्या ब्रेड पेक्षाही जास्त हानिकारक ठरू शकतात.

ब्राऊन ब्रेडचे फायदे

एका अभ्यासानुसार, होल ग्रेन खाल्ल्याने शरीरातील फायबरची कमतरता भरून निघते, तर फायबरमुळे तुमची पचनक्रियाही चांगली राहते. हे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. रोज एक ते दोन होल ग्रेन ब्रेड खाऊ शकतो.

ब्राऊन ब्रेड आहारात किती योग्य आहे

अलीकडच्या काळात ब्राऊन ब्रेडचे मार्केट खूप वाढले आहे आणि फिटनेस फ्रिक व्हाईट ऐवजी ब्राऊन ब्रेड घेण्यास प्राधान्य देत आहेत. बरेचदा लोक ते नाश्ता म्हणून घेतात. व्हाईट ऐवजी तुम्ही निरोगी राहण्यासाठी ब्राऊन ब्रेड घेत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, चला तर मग जाणून घेऊया का.

ब्राऊन ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक

खरं तर, ब्राऊन ब्रेडचा कलर अधिक चमकदार आणि ब्राउन दिसण्यासाठी अनेक वेळा आर्टिफिशियल कलर देखील अ‍ॅड केले जातात. हे कॅरॅमल रंगाचे असतात, जे कोल्ड ड्रिंक्समध्येही वापरले जातात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT