Business Idea esakal
लाइफस्टाइल

Business Idea : गुंतवणूक कमी अन् जास्त नफा! दिवाळीपूर्वी हे 5 सिझनेबल व्यवसाय सुरू करा, होईल फायदाच फायदा!

कमी पैशात सुरू करता येतील अशी भन्नाट बिझनेस आयडियाज

Pooja Karande-Kadam

Business Idea : शहरात राहणाऱ्या ३० वर्षीय पलाशचे बाजारपेठेत शूजचे मोठे दुकान आहे. त्यातून त्याला मोठा फायदा होतो. पण या व्यवसायासोबत तो जोडधंदाही करतो. त्याच्या दुकानात चप्पल,सँडल, शुजच्या अनेक व्हरायटी आहेत. अन् त्याच्या दुकानाबाहेर त्याने पूजेच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू लावल्या आहेत.

आता दिवाळीसाठीही त्याने लायटिंगच्या वेगवेगळ्या माळा, दिवे, पणत्या, आकर्षक रांगोळीचे साचे, पूजेच्या साहीत्याचा पुडा अशा वस्तूंचा माल भरला आहे. केवळ दिवाळी नाहीतर वर्षभर जे कोणते सण येतील त्या प्रत्येकवेळी तो असा माल आणतो.

या जोडधंद्यामुळेच माझा जास्त फायदा होतो, असे पलाशचे म्हणणे आहे. कारण, दिवाळीचे सामान खरेदी करायला आलेला व्यक्ती चप्पलही घेतो, अन् चप्पल खरेदीला आलेल्या महिला गृह सजावटीचे सामान, पुजेचा पुडा, रांगोळ्या खरेदी करतात.

या वस्तू खरेदी करताना मला मोजकाच पण आकर्षक माल आणावा लागतो त्यामुळे गुंतवणूक कमी असते अन् फायदा मात्र दुप्पट होतो.

भारत हा सणांचा देश आहे. इथे वर्षभर कुठला ना कुठला सण साजरा केला जातो. येत्या काही दिवसांत भारतात दिवाळी हा मोठा सण साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला काही व्यवसाय करून पैसे कमवायचे असतील तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली असू शकते.

येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 व्यवसायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला सणासुदीच्या काळात भरघोस उत्पन्न देतील. तसेच, तुम्ही त्यांना उर्वरित वेळेसाठी अर्धवेळ म्हणून सुरू ठेवू शकता.

पूजा साहित्य

अवघ्या काही दिवसांत दिवळी येणार आहे. दिवाळीत माता लक्ष्मीची पूज केली जाते. त्यामुळे पुजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी घेण्यास महिला प्राधान्य देतात. जर तुम्हाला पूजा साहित्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

दिवाळी आणि छठपूजेपर्यंत पूजा साहित्यासाठी बाजारपेठ गजबजलेली असते. यासाठी केवळ 5000 रुपये किंवा 7000 रुपये गुंतवून तुम्ही दररोज 2,000 रुपयांपर्यंत कमाई करता येते. (Business Idea)

या व्यवसायात खूप फायदा आहे

मूर्ती आणि मेणबत्ती

लक्ष्मी मातेचे फोटो आणि मूर्ती दिवाळीसाठी पूजेसाठी घरोघरी आणल्या जातात. दिवाळीत घरांमध्ये दिव्यांशिवाय फॅन्सी मेणबत्त्याही पेटवल्या जातात. अशा परिस्थितीत हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. तुम्ही ते स्वतः बनवू शकता किंवा मोठ्या प्रमाणात विकत घेऊ शकता. कमी गुंतवणुकीत प्रचंड उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.

फॅन्सी मेणबत्त्याही घराची सजावट वाढवतात

मातीचे दिवे

इलेक्ट्रॉनिक दिव्यांव्यतिरिक्त, भारतात दिवाळी आणि छट पूजेवेळी देखील दिवे लावले जातात. दिवाळीला दिव्यांचा सण म्हणतात. यावेळी मातीचे दिवे मुबलक प्रमाणात विकले जातात. अशा परिस्थितीत हा व्यवसाय तुम्हाला भरपूर नफा देखील देईल. तुम्ही स्वतः दिवे बनवू शकता किंवा कुंभारांकडून वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे बनवू शकता आणि ते मोठ्या प्रमाणात विकू शकता.

आजकाल दिवे बनवण्याची यंत्रेही बाजारात उपलब्ध आहेत. या व्यवसायात छोटीशी गुंतवणूक करून मोठी कमाई करता येते. त्यामुळे तुमचाही फायदा होईल आणि कुंभांराचाही होईल. त्याला न फिरता मार्केट उपलब्ध होईल.

मातीच्या दिव्यांशिवाय दिवाळीला शोभा नाही

आकाश कंदील

प्रत्येक वर्षी नवे आकाश कंदिल बाजारात येत असतात. जूना कंदील व्यवस्थित असला तरी प्रत्येक वर्षी नवा खरेदी केला जातो. त्यामुळे या व्यवसायातही फायदा जास्त आहे.

प्रत्येक वर्षी नवा खरेदी केला जातो

इलेक्ट्रॉनिक लाईट्स

दिवाळीच्या काळात जवळपास सर्वच ठिकाणे, मग ते घर असो किंवा ऑफिस, अगदी चौक आणि दुकाने इलेक्ट्रॉनिक लाईट्सच्या माळांनी सजवली जातात. आपण इच्छित असल्यास, आपण घाऊक बाजारातून खरेदी करू शकता.

आपल्या घराजवळील बाजारात विकू शकता. या लाइट्सवर उत्कृष्ट मार्जिन उपलब्ध आहेत. त्यांची विक्री करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचीही मदत घेऊ शकता.

आकर्षक दिव्यांच्या अनेक व्हरायटी आहेत

सजावटीच्या वस्तू

भारतात केवळ दिवाळीला नाहीतर सजावटीच्या वस्तूंची मागणी वर्षभर राहते. पण, दिव्यांशिवाय दिवाळीच्या काळात घराला सजावटीच्या वस्तूंनीही सजवले जाते. दिवाळी-दसर्‍याशिवाय ख्रिसमस आणि नववर्षापर्यंत सजावटीच्या वस्तूंना मागणी असते. तुम्ही होलसेल बाजारात देखील खरेदी करू शकता.

यात तोरणं, फुलांच्या माळा, वेगवेगळे शो पीस हेही असतात. तसेच, आपण ही उत्पादने आपल्या स्वत: च्या हातांनी घरी बनवू शकता. या उत्पादनांवर मोठा फरक आहे. कारण, लोक आवडल्यास जास्त पैसे द्यायला तयार असतात. त्यासाठी गुंतवणूकही कमी करावी लागेल.

सजावटीच्या वस्तूंची मागणी वर्षभर राहते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT