कार स्टार्ट होत नसल्यास
कार स्टार्ट होत नसल्यास Esakal
लाइफस्टाइल

Monsoon Tips पावसात गाडी स्टार्ट होत नाही...नका घेऊ टेन्शन....

Kirti Wadkar

तुम्ही ऑफिसला किंवा एखाद्या प्रवासासाठी निघाला आहात. कारमध्ये सर्व सामान ठेवलंत मात्र कार सुरूच झाली नाही तर? तुमच्यासोबतही हे होवू शकतं. विविध कारणांमुळे काही वेळा कार स्टार्ट होवू शकत नाही. Car Care Tips Know the reasons behind car not getting Started

अशा वेळी मॅकेनिकला Mechanic बोलावून कारची दुरुस्ती Car Repair करायची म्हंटलं तरी बराच वेळ जाऊ शकतो. शिवाय त्यावेळी मॅकेनिक त्वरित उपलब्ध होण्याची शक्यता कमी असू शकते. कार स्टार्ट होत नसल्यास चिंतेत पडण्यापेक्षा सर्वप्रथम संयम राखणं गरजेचं आहे.

आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमची कार स्टार्ट न होण्याची समस्या सुटू शकते तेही मॅकेनिक शिवाय.

कारमधील काही साधे फंक्शन आणि त्यामध्ये निर्माण होणारे काही साधे बिघाड तुम्ही समजून घेतलेत तर तुम्हाला स्वत:ला कार दुरूस्त करून ही समस्या सोडवणं शक्य होईल.

डेड बॅटरी

अनेकदा खास करून थंड वातावरण किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. जर तुमच्या गाडीमध्ये पुरेस इंधन असेल, तरीही सेल्फ स्टार्टने गाडी सुरू होत नसेल तर बॅटरी कमी आहे किंवा बॅटरी डेड आहे हे समजून जावं.

अशावेळी तुम्ही दोन पर्यायांनी गाडी सुरू करू शकता. यातील पहिला पर्याय म्हणजे इतरांची मदत घेऊन गाडीला धक्का मारून गाडी सुरू करणं आणि दुसरा पर्याय म्हणजे बॅटरी काढून ती चार्जिंग स्टेशन, गॅरेज अशा ठिकाणी चार्ज करून आणणं आणि गाडी स्टार्ट करणं.

हे देखिल वाचा-

बॅटरीच्या कनेक्शनमध्ये समस्या

काही वेळा बॅटरीची तार तुटल्यानेदेखील सेल्फ स्टार्ट काम करत नाही. त्यामुळे गाडीत इंधन असेल आणि बॅटरीही चार्ज असेल तर बॅटरीशी जोडल्या गेलेल्या तारा एकदा तपासून पहा. ही समस्या सहजपणे तुम्ही दूर करू शकता.

की-फॉबमध्ये समस्या

जर तुमची कार पुश-बटन स्टार्टची असेल तर काहीवेळा की-फॉबमध्ये काही बिघाड झाला असल्यास इंजिन स्टार्ट होण्यास अडचण निर्माण होवू शकते. यासाठी की-फॉब बटन चेक करा. जर त्यात बिघाड झाला असेल तर तो सहज दुरुस्त होण्यासारखा असतो. तसचं अनेकदा चावीची बॅटरी कमी झाल्याने किंवा पूर्णपणे संपल्याने देखील की-फोब काम करत नाही.

फ्यूएल फिल्टरमध्ये समस्या

फ्यूएल फिल्टर जाम झाल्यास गाडी स्टार्ट न होण्याची समस्या निर्माण होवू शकते. जर तुमची कार स्टार्ट होत नसेल तर एकदा फ्यूएल फिल्टर साफ करून घ्या.

स्टार्टर मोटरमध्ये बिघाड

गाडी सुरू करण्यासाठी एक स्टार्टर मोटर बसवण्यात आलेलं असतं. हे स्टार्टर मोटर गाडीने ४०-५० हजार किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर बदलणं गरजेचं असतं. अनेकांना याची कल्पना नसते तर अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. हे मोटर बिघडल्यास गाडी स्टार्ट होण्यास समस्या उद्भवू शकते.

हे देखिल वाचा-

पावसाळ्यात गाडी स्टार्ट न झाल्यास

पावसाळ्यामध्ये गाडी स्टार्ट न होण्यामागे इंजिनमध्ये पाणी जाणं ही देखील एक समस्या कारणीभूत ठरू शकते. अशात कार सतत स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे कारमध्ये एखादा बिघाड होवू शकतो.

यासाठी सर्वप्रथम मॅकेनिक सॉल्वंटनं इंजिनवर स्प्रे करा. त्यानंतर इंजिन स्वच्छ करून घ्या. यामुळे इंजिनच्या स्पार्क पॉइंटचं नुकसान होणार नाही.

अशा प्रकारे तुम्ही संयम राखल्यास गाडी स्टार्ट न होण्यामागचं कारण तुमच्या लक्षात येऊ शकतं आणि त्यावर तुम्ही उपाय शोधू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Vastu Tips: बाथरूममध्ये ठेवलेल्या 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता, आजच काढा बाहेर

India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

SCROLL FOR NEXT