cashew and almond  sakal
लाइफस्टाइल

Healthy Dry Fruit: शरीरासाठी बदाम अधिक फायदेशीर की काजू? जाणून घ्या...

तंदुरुस्त आरोग्यासाठी काजू आणि बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

Aishwarya Musale

ड्रायफ्रुट्स हे सर्वच ऋतूंमध्ये खाल्ले जात असले तरी विशेषतः हिवाळ्यात सुका मेवा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रुट्स हे प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, जस्त आणि उच्च चरबीसह खनिजांचा एक मजबूत स्रोत देखील आहेत. लोक केवळ काजू, बदाम स्वतःच खातात असे नाही तर लहान मुलांना आणि वृद्धांनाही खायला आवडतात. फार कमी लोकांना हे माहित आहे की चव आणि किंमती जवळजवळ सारख्या असूनही, काजू, बदाममध्ये असलेल्या घटकांमध्ये खूप फरक आहे.

काजू आणि बदाम यांच्या फरकाबद्दल बोलायचं झालं तर दोन्हीचे स्वतंत्र फायदे आहेत. काजू आणि बदाम या दोन्हीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, तरी बदामामधील फॅट शरीरासाठी अधिक चांगले मानले जातात.

काजूचे फायदे काय आहेत?

काजूमध्ये भरपूर व्हिटॅमिन के आणि झिंक आहे. तसेच काजूमध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-ई आणि B-6 या सगळ्यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच बदाम आणि काजू या दोन्हींचे स्वतःचे वेगळे आरोग्य फायदे आहेत, असे म्हटले जाते.

मेंदूसाठी काजू चांगले आहेत. तसेच मेंदूची शक्ती वाढवण्याचं काम काजू करतात. काजूमध्ये विशेषतः लोह आणि जस्त जास्त प्रमाणात असते. तुमच्या सर्व पेशींना लोह ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते, यामुळे अशक्तपणा येत नाही. कॅलरीजबद्दल बोलायचं झालं तर 23 काजूमध्ये सुमारे 200 कॅलरीज असतात.

बदामाचे फायदे काय आहेत?

पोटासाठी बदाम हा चांगला मानला जातो. बदाममध्ये सर्वाधिक फायबर असतात. आपण जर काजूशी तुला केली तर बदामामध्ये जास्त फायबर आढळतात. तसेच बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील असते, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मानले जाते.

कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की, बदाम हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT