Chanakya Niti esakal
लाइफस्टाइल

Chanakya Niti: आर्थिक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' चार लक्षात ठेवा

जुलमी 'नंद' घराण्याची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्याचेच योगदान होते.

सकाळ डिजिटल टीम

आर्य चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्त ऊर्फ कौटिल्य हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होते. जुलमी नंद घराण्याची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्याचेच योगदान होते. त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान चाणक्य नीती नावाने प्रसिद्ध आहे. यात वागणुकीचे काही नियम सांगितले आहेत.

दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका. स्वत: वर प्रयोग करून शिकाल तर तुमचे वयही कमी पडेल, असे चाणक्य सांगत. चाणक्यांनी आर्थिक बाबतीतही काही खास तत्वज्ञान सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीग्रंथातील तिसऱ्या अध्यायातील २१ व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे जिथे मूर्ख माणसांचा अनादर केला जातो आणि ज्ञानी माणसाचा सन्मान केला जातो तसेच त्यांनी केलेल्या सूचना आचरणात आणल्या जातात तिथे धनधान्याची कमी कधीच आढळत नाही.

● जर तुमच्या घरात वारंवार काच फुटत असेल तर समजून घ्या की हे काही येणाऱ्या आर्थिक अडचणीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत, येणाऱ्या संकटासाठी कुटुंबाने सावध असले पाहिजे आणि आर्थिक व्यवस्था केली पाहिजे.

● चाणक्य सांगतात की जिथे अन्नाचा एकही कण वाया घालवला जात नाही, जिथे अन्नाचा सन्मान राखला जातो अश्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते. परंतु ज्याठिकाणी अन्नाचा अपमान केला जातो आणि अन्न वाया घालवले जाते तिथे कधीही सुख - समृद्धी नांदत नाही आणि धनधान्य तिथे टिकत नाही.

● आचार्य चाणक्य सांगतात की जिथे पती पत्नीच्या नात्यामध्ये कुठलाही कडवटपणा नसतो केवळ प्रेम असते अश्या दाम्पत्यांकडे धनधान्य आणि सुख-समृद्धी कायमच राहते.परंतु जिथे पती पत्नी यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे,वादविवाद किंवा कडवटपणा असेल तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही.

● आचार्यांचे असे मत होते की जर घरात तुळशीचे रोप असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी आणि ते सुकू देऊ नये. तुळशीचे झाड सुकणे हे येणारे आर्थिक संकट दर्शवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT