lifestyle sakal
लाइफस्टाइल

Lifestyle: झोपण्यापूर्वीच्या ‘या’ सवयी आजच बदला नाहीतर तुमचा चांगला चेहरा...

जर आपण या चुका सुधारल्या तर आपला चेहरा अधिक तजेलदार आणि टवटवीत दिसणार.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं, आपला चेहरा नेहमी फ्रेश असावा, असं वाटतं. त्यासाठी प्रत्येकजण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण अनेकदा अनेक गोष्टी ट्राय करुन सुद्धा काहीच फरक पडत नाही. कारण आपल्या काही अशा सवयी असतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो. जर आपण या चुका सुधारल्या तर आपला चेहरा अधिक तजेलदार आणि टवटवीत दिसणार.

स्वत:ची काळजी न घेणे -

कामाची वेळ, जेवणाची वेळ किंवा झोपण्याची वेळ यामुळे आपल्या चेहऱ्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्युटी प्रॉडक्ट्स लावून झोपणे -

अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतात मात्र त्यावर वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्सही लावतात. तुम्हाला जर ही सवय असेल तर आजच थांबवा. नाहीतर तुमच्यावर परिणाम दिसून येईल. रात्री त्वचेची छिद्रे मोकळी होतात अशात जर तुम्ही चेहऱ्यावर काहीही लावले तर त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुम येण्यास सुरवात होते.

हाताची काळजी न घेणे -

जर तुम्हाला चेहऱ्यासोबत तुमच्या हाताचे सौंदर्य खुलवायचे असेल तर हाताची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने हात साबणाने स्वच्छ धुवावे. झोपण्यापूर्वी हातावर हँड क्रीम लावावी. त्यामुळे हातावरील त्वचेवर मऊपणा राहील.

टोनर वापरा -

टोनर हा आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. टोनर आपल्या त्वचेचं बॅक्टेरियापासून संरक्षण करतं. रात्री झोपण्यापूर्वी कॉटननी टोनर आपल्या चेहऱ्यावर लावावं. याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT