(PMEGP)  google
लाइफस्टाइल

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम : अशा झाल्या आहेत सुधारणा

उत्पादन युनिट्ससाठी कमाल प्रकल्प खर्च सध्याच्या २५ लाख रुपयांवरून ५० लाख रुपये करण्यात आला आहे. त्याच वेळी, सेवा युनिट्ससाठी ते १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आले आहे.

नमिता धुरी

मुंबई : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) २०२५-२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासाठी एकूण १३,५५४.४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) सांगितले की ही योजना पाच आर्थिक वर्षांत ४० लाख लोकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करेल. ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी म्हणजेच २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पीएमईजीपीचे उद्दिष्ट बिगरशेती क्षेत्रात सूक्ष्म उद्योग उभारून देशभरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.

या योजनेची कालमर्यादा वाढवण्याबरोबरच त्यात आणखी काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, उत्पादन युनिट्ससाठी कमाल प्रकल्प खर्च सध्याच्या २५ लाख रुपयांवरून ५० लाख रुपये करण्यात आला आहे. त्याच वेळी, सेवा युनिट्ससाठी ते १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आले आहे.

ग्रामोद्योग आणि ग्रामीण भागाची व्याख्या बदलली

पीएमईजीपीमध्ये ग्रामोद्योग आणि ग्रामीण क्षेत्राच्या व्याख्याही बदलण्यात आल्या आहेत. पंचायती राज संस्थांच्या अंतर्गत येणारे क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून गणले जातील. महानगरपालिका अंतर्गत येणारे क्षेत्र नागरी क्षेत्र मानले जातील. सर्व अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना अर्ज प्राप्त करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी असेल, अर्ज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो. आकांक्षी जिल्हे आणि 'ट्रान्सजेंडर' अर्जदारांना एका विशेष श्रेणीमध्ये ठेवले जाईल आणि ते अधिक अनुदान मिळविण्यास पात्र असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT