Decoration Idea Sakal
लाइफस्टाइल

Decoration Idea: 'या' बजेट फ्रेंडली गोष्टींनी सजवा लहान मुलांची रूम

Decoration Idea: जर तुम्हीही लहान मुलांची रूम सजवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Puja Bonkile

child room decoration idea budget friendly kids room makeover ideas

आजकाल बहुतेक मुलांना त्यांच्या रूममध्ये राहायला आवडते. पालक आपल्या मुलांसाठी वेगळी रूम बनवून खास पद्धतीने सजवतात. पण मुलाची रूम सजवणे वाटते तितके सोपे नाही. तुम्ही पुढील पद्धतीने लहान मुलांची रूम समजवून त्यांना आनंदी करू शकता.

  • भिंत

रूमला आकर्षक लूक देण्यासाठी तुम्ही मुलांच्या आवडत्या वॉलपेपरने रूमची भिंत सजवू शकता. भिंतींवर कार्टून , तारे किंवा सुंदर प्रिंट असलेले स्टिकर लावून सजवू शकता.

  • ग्लोब

लहान मुलांच्या रूममध्ये ग्लोब ठेऊ शकता. यामुळे त्यांच्या ज्ञानात देखील भर पडेल. बाजारात अनेक प्रकारचे ग्लोब उपलब्ध आहेत.

  • प्रेरणादायी विचार

मुलांनी त्यांच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकत राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लहान मुलांच्या रूममध्ये प्रेरणादायी विचार असलेले स्टिकर्स लावू शकता. यामुळे रूममध्ये सकारात्मक वातावरण राहील.

  • स्टडी टेबल

लहान मुलांच्या रूममध्ये स्टी टेबल ठेऊ शकता. तुम्ही हा टेबल खास पद्धतीने सजवू शकता. लहान मुलांना कार्टूनच्या गोष्टी प्रिय असतात. तुम्ही कार्टून प्रिंटने टेबल सजवू शकता. हे पाहून लहान मुलं खुप आनंदी होतील.

  • सुंदर फर्निचर

लहान मुलांची रूम सुंदर फर्निचरने सजवू शकता. तुम्हीही फर्निचर खरेदी करत असाल तर सेफ्टी लक्षात ठेऊन निवड करावी. टोकदार कडा असलेले फर्निचर वापरू नका. यामुळे लहान मुलांना इजा होऊ शकते. मुलांच्या उंचीनुसार बेड आणि खुर्ची तयार करावी. यामुळे त्यांना वापर करणे सोपे जाईल.

  • रंग

बहुतेक मुलांना रंगीबेरंगी गोष्टी आवडतात. यामुळे मुलाची रूम त्यांच्या आवडत्या रंगाने रंगवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT