Children's Day
Children's Day sakal
लाइफस्टाइल

Children's Day: मुलांसोबत साजरा करा बालदिवस; द्या एकापेक्षा एक हटके शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. नेहरूंचा जन्म 1889 मध्ये झाला आणि ते 'चाचा नेहरू'ओळखले जातात. त्यांचे लहान मुलांवर विशेष प्रेम होते. नेहरुंना लहान मुलांची खूप आवड होती.

लहान मुले भारताचे भविष्य आहे असे ते नेहमी म्हणायचे आणि त्यांच्या स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. पंडितजींच्या निधनानंतर नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्यात येतो. (Childrens Day 2022 marathi best Wishes status message)

आज आपण तुमच्या आयुष्यातील लहान मुलांना आणि तरुण मुलामुलींना बालदिनाचे शुभेच्छा देण्यासाठी एकापेक्षा एक भारी संदेश सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

१. खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच

तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या

लहान बाळाला सुद्धा

बालदिनाच्या खूप शुभेच्छा!

२.  फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, 

ते सर्वकाही करू शकतात. 

अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा

३. बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..

बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!

बालपणीच्या आठवणीत हरपते मन..

येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.

बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

४. पाखरांची चपळता,

प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता

नि झऱ्याचा खळखळाट

म्हणजे मुले...

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५. तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…

प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…

आनंदी राहा आणि आठवणी जपा…

बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.

६. कोनाड्यात पडलेल्या
जुन्या आठवणींना
पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे,
आज आपलं हरवलेलं बालपण,
पुन्हा नव्याने जगायचं आहे,
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

७. जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day

८. मनात बालपण जपणाऱ्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

९. आपण आपल्या इच्छेनुसार ,आपल्या मुलांना घडवू शकत नाही ,आपण त्यांना त्याच रूपात स्वीकार प्रेम देऊया ज्या रुपात देवाने त्यांना आपल्यास दिले आहेत. Happy Children’s Day !!

१०. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते... बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT