Chocolate Day
Chocolate Day esakal
लाइफस्टाइल

Chocolate Day : तुम्हाला माहितीये का? चॉकलेटच्या रंगामागेही दडलाय तुमच्या मनातला अर्थ

सकाळ डिजिटल टीम

Chocolate Day 2023 : चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? खर तर हा प्रश्न होऊच शकत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ शकत नाही. कोणालाही गिफ्ट काय द्यायचं म्हटलं तर पहिला ऑप्शन सुचतो तो चॉकलेटचा. त्यात आज व्हॅलेंटाइन विकचा तिसरा दिवस. म्हणजे चॉकलेट डे. आज तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या भावना कोणाजवळ व्यक्त करायच्या असतील तर गोड गोड चॉकलेटसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. अशावेळी चुकीच्या रंगाचं चॉकटेल देऊन चुकीचा अर्थ पोहचवण्यापेक्षा योग्य अर्थ जाणून घ्या.

Chocolate Day

चॉकलेट फक्त जोडिदारालाच द्यावं असा काही नियम नाही. तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच तुम्ही चॉकलेट देऊ शकतात. प्रत्येकाच्या बाबतीत असणाऱ्या भावना तुम्ही चॉकलेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतात.

डार्क चॉकलेट - डार्क चॉकलेट आपण आपल्या जोडिदाराला सुरक्षित ठेवू. त्याची / तिची काळजी घेऊ असा संदेश जोडिदारापर्यंत पोहचवते. डार्क चॉकलेट चवीला कडू असलं तरी त्याचे फायदे अनेक आहेत.

Chocolate Day

व्हाईट चॉकलेट - व्हाईट चॉकलेटची टेस्टच वेगळी असते. याची चव सौम्य असते. जर तुमच्या जोडिदाराचा स्वभाव तसाच असेल तर त्याला व्हाइट चॉकलेट गिफ्ट करा.

मिल्क चॉकलेट - मिल्क चॉकलेट म्हणजे व्हाईट चॉकलेट नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. पण दूध टाकून बनवलेल्या चॉकलेटला मिल्क चॉकलेट म्हणतात. याला भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. रोमँटिक भावनांशी मिल्क चॉकलेट जोडलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT