Christmas 2022 esakal
लाइफस्टाइल

Christmas 2022 : या ठिकाणी २५ डिसेंबरला नाही तर 6 जानेवारीला साजरा होतो ख्रिसमस!

ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी असला, तरी आजच्या काळात तो सर्वजण साजरा करतात.

सकाळ डिजिटल टीम

The Oldest Church Celebrate Christmas On 6 Jan : ख्रिसमस म्हटलं की जसा सांता, ख्रिसमस ट्री या गोष्टी पटकन आठवतात तसंच चर्च हा सुध्दा ओघानेच येणारा विषय आहे. सगळ्याच चर्चमध्ये ख्रिसमससाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Armenian Apostolic Church

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी असला, तरी आजच्या काळात तो सर्वजण साजरा करतात. असे म्हणतात की, 25 डिसेंबर रोजी देवाचे पुत्र प्रभु येशूचा जन्म झाला.

ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक शहरात चर्च आहेत आणि प्रत्येक चर्चची स्वतःची श्रद्धा देखील आहे. हा सण अत्यंत पवित्र समजला जातो.

Armenian Apostolic Church

येशू सोबतच होता या चर्चचा उदय

तुम्हाला माहित आहे का की, जगात असे सुद्धा चर्च आहे, जिथे ख्रिसमस 25 डिसेंबर ऐवजी 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. असं म्हणतात की, ख्रिस्ती धर्माचा उदय येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच झाला. त्यावेळी आर्मेनियन अपोस्टोलिक चर्चचाही उदय झाला.

काय आहे कथा

असेही म्हटले जाते की, चौथ्या शतकात राजा टिरिडेट्सने ख्रिश्चन धर्माला आर्मेनियाचा राज्य धर्म बनवला. एवढेच नाही तर, त्या राजाने ग्रेगरीला पहिला कॅथलिक बनवले आहे. असे मानले जाते की, ग्रेगरीने येशूला पृथ्वीवर उतरताना पाहिले होते.

ग्रेगरीनेच राजाला अर्मेनियामध्ये चर्च बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. आता अर्मेनिया हे जगातील सर्वात जुने चर्च मानले जाते. आजच्या काळात अर्मेनिया हा ख्रिश्चन शासित देश बनला.

6 जानेवारीला ख्रिसमस होतो साजरा

अर्मेनियन अपोस्टोलिक चर्चने 25 डिसेंबर ऐवजी 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला होता, असे म्हटले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, 6 जानेवारीला एपिफेनी हा सण साजरा केला जातो आणि या सणाच्या निमित्ताने ख्रिसमस साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT