Christmas Celebration 2023 esakala
लाइफस्टाइल

Christmas Celebration 2023 : शाळेतील ख्रिसमस पार्टीसाठी असं बनवा मुलांना सॅन्ताक्लॉज, होईल कौतुकाचा वर्षाव

सांताचा केवळ ड्रेसच नाहीतर मुलांना या गोष्टीही शिकवा

Pooja Karande-Kadam

Christmas Celebration 2023 : लहान मुलांचा आवडता सण ख्रिसमस लवकरच येत आहे. आनंदाचा हा सण, ख्रिसमस, दरवर्षी 25 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या खास दिवशी मुलांना चॉकलेट, केक आणि भेटवस्तू दिल्या जातात. ख्रिसमसच्या एका संध्याकाळी, लोक सिक्रेट सांताचा गेटअप करून लहान मुलांना भेटवस्तू देतात.

मुलेही सिक्रेट सांताची आतुरतेने वाट पाहत असतात. जेणेकरून त्यांनाही सांताकडून भेटवस्तू मिळतील. एवढेच नाही तर या दिवशी लहान मुले सांताचा ड्रेस परिधान करून खूपच गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांताक्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.

कपडे

जर तुम्हीही या ख्रिसमसला तुमच्या मुलाला सांता बनवण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी बाजारातून लहान मुलाच्या आकाराचे सांताक्लॉजचे कपडे खरेदी करा. अनेक वेळा, पैसे वाचवण्यासाठी, पालक त्यांच्या मुलासाठी आकाराने मोठा ड्रेस खरेदी करतात. जेणेकरून तो पुढच्या वर्षीही तो घालू शकेल. हे अजिबात करू नका. मुलांना परफेक्ट फिट होईल असाच ड्रेस विकत घ्या.

थंडीपासून सावध रहा

ख्रिसमस जसजसा जवळ येतो तसतशी थंडी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मूलं आजारीही पडू शकतात. मुलाला सांताक्लॉजचे कपडे घालण्यापूर्वी, त्याला आत उबदार कपडे घाला. थंडीचे दिवस आहेत, त्यात सकाळची शाळा असते. त्यामुळे सांताक्लॉजच्या ड्रेसने मुलाचे आतील आणि आतील कपडे व्यवस्थित झाकलेले आहेत हे लक्षात ठेवा.

कॅप, पिशवी विसरू नका

मुलाला सांताचा लुक देण्यासाठी पोम पॉम असलेली सांता कॅप घाला. तसेच खांद्यावर लहान लाल रंगाची पिशवी घ्यायला सांगा. ज्यामध्ये इतर मुलांसाठी भेटवस्तू, चॉकलेट असतील. यामुळे मुलांना इतर मित्रांसोबत वस्तू वाटण्याची सवय लागेल.

बेल्ट देखील महत्वाचा आहे

जर तुम्हाला तुमचे मुल हुबेहुब सांता सारखे दिसायचे असेल तर, एक मोठा काळा बेल्ट आणि काळे चमकदार बूट घालायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यासोबत पांढऱ्या रंगाचे हातमोजेही घालू शकता. जे सांताच्या लुकला परफेक्ट मॅच होतील.

दाढीचा वापर

आजकाल बाजारात पांढर्‍या रंगाची सांता दाढी वेगळी उपलब्ध आहेत. जी तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला ते चिकटवण्याची गरज नाही कारण त्यात रबर आहे. पांढऱ्या दाढीसोबतच मुलाला पांढरे केस आणि एक चष्मा द्यावा. ज्यामुळे शाळेतील फॅन्सी ड्रेसमध्ये त्यांचाच नंबर येईल.

मुलांना हे शिकवा

मुलांना सांता सारखे चालणे अन् काही संवाद म्हणायला शिकवा. ज्यामुळे तुमचा मुलगा केवळ सांता सारखा दिसणारच नाहीतर त्याच्यासारखेच बोलेल. सांता सगळ्यांना गिफ्ट देतो तसेच मुलाला समाजातील गरीब मुलांसाठी सांता व्हायला शिकवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

Snapchat Love Story: स्नॅपचॅटवर प्रेम ठरले पठ्याने थेट ओडिसा गाठले ; प्रेयसीला घेऊन पठ्ठ्या थेट गावात हजर

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल

Jalgaon Jamod ACB Action : जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कार्यालयातच रंगेहात अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT