home sanitization 
लाइफस्टाइल

कोरोनाकाळात घरातील 'या' गोष्टींची सफाई अगोदर करा

सकाळ ऑनलाईन टीम

सध्या कोरोना नामक शत्रूमुळे जो-तो कुठेही हात लावल्यावर लगेच हात सॅनिटायझरने स्वच्छ करीत आहे. घरात असे कही ठिकाण असतात जी जंतू, बॅक्टेरिया किंवा विषाणूंपासून मोकळे नसतात. जितके आपण विचार करतो तितके. आम्ही घरातील अशा सहा ठिकाणांविषयी सांगणार आहोत ज्यांची साफसफाई अगोदर केली पाहिजे. 

१. दरवाजे आणि कॅबिनेटचे नाॅब्स 
- घराचे दरवाजे, वाॅर्डरोबचे दरवाजे आणि किचन कॅबिनेट्सचे नाॅब्सच्या स्वच्छतेकडे बहुतेकदा दुर्लक्ष होते. ती चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. त्यासाठी पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात एकत्र करुन कपड्याने नाॅब्स स्वच्छ करा.

२.स्वयंपाक घर 
स्वयंपाक घर जिथे सर्वाधिक कचरा तयार होतो. तसेच घाणही होते. साठवण्यासाठी वापरण्यात येणारे भांडी वेळोवेळी स्वच्छ करुन घ्या. गॅस व्यतिरिक्त चिमणी, मायक्रोवेव्ह, मिक्सर ग्राइंडर, एग्जाॅस्ट फॅनची नियमित स्वच्छताही करा. 

सीलिंग फॅन्स 
दिवसभर चालू राहणारे सीलिंग फॅन्स खूप धूळ स्वतःकडे ओढतात. पंख्याच्या ब्लेड्सच्या वरील भागात मोठ्याप्रमाणावर धूळ साचते. कमीत-कमी दहा दिवसांच्या अंतराने पंखे हलक्या कपड्याने पुसल्यानंतर काॅटनच्या वाळलेल्या फडक्याने पुसून घ्या.

४. सिंक
घरात जर्म्स सर्वाधिक किचन आणि बाथरुमच्या सिंकमध्ये असतात. तुम्ही दिवसभरात एकदा सिंकला साबणाच्या पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. सिंकचे कोने चांगल्या प्रकारे घासा. ती वाळू द्या. तसेच नळ आणि तिची टोटीही स्वच्छ करा. 

५.इलेक्ट्राॅनिक उपकरण 
आज जवळजवळ प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्राॅनिक उपकरण असतात. जसे की मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटाॅप आदी. यावर सर्वाधिक जर्म असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करतो. घरातील सर्व इलेक्ट्राॅनिक वस्तू आणि गॅजेट्स साॅफ्ट मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ करा. स्वच्छतेसाठी पाणी आणि रबिंग अल्कोहल समान मात्रेत मिसळून घ्या. 

६. बाथरुम 
बाथरुम घरातील सर्वात अधिक वेळेपर्यंत ओले राहणारी रुम आहे. येथे सिंक, शावर, टाॅयलेट कमोडसारखी वस्तू आहेत. ही सर्व जर्म्सला लपण्यासाठी जागा देतात. जेव्हा तुम्ही सिंकची स्वच्छता करत असाल तर त्याच बरोबर टाॅयलेटचे भांडेही साफ करुन घ्या. बाथरुमची फरशीही वेळोवेळी ब्लीचिंग पावडरने स्वच्छ करुन घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! 5G विसरा, 6G ची स्पीड बघून डोक्याला हात लावाल, 'या' देशाने केली टेस्टिंग, इंटरनेट स्पीडचे सर्व रेकॉर्ड मोडले

Fact Check : अजित आगरकरची दादागिरी आता बस झाली... रवी शास्त्री बनणार निवड समितीचे अध्यक्ष? X पोस्ट व्हायरल

Shashikant Shinde: महायुती सरकारवर जनतेचा रोष: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सरकारकडून मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्याचे काम

Nutritious Diwali Meal: दिवाळीत जेवणाचे ताट सजवा रंगीबेरंगी पोषक पदार्थांनी – आहार तज्ज्ञांचा सल्ला, स्वाद आणि आनंद कायम ठेवा!

Hingoli Ashram School Incident : आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुचित प्रकार; विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक निलंबित

SCROLL FOR NEXT