cleaning tips  esakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips : पाण्याची बाटली घाण झालीय; मग वापरा हा ऊपाय

अनेकदा बाटल्या घाण होऊन पिवळ्या पडतात

सकाळ वृत्तसेवा

घरगुती उपाय : घराबाहेर पडताना आपण बाटलीत पाणी घेऊन जातो. पण तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही ज्या बाटल्यांमध्ये पाणी घेवून जाता त्या अनेकदा घाण होऊन पिवळ्या पडतात. बाटली आतून साफ ​​करणे हे सोपे नाही. पण काही टिप्स फॉलो करून तुम्ही गलिच्छ पाण्याच्या बाटल्या सहज स्वच्छ करू शकता.

साबण आणि गरम पाणी

जर तुम्हाला पाण्याची बाटली रोज स्वच्छ करायची असेल तर यासाठी तुम्ही कोमट पाणी आणि साबणाची मदत घेऊ शकता. यासाठी गरम पाण्याने पाण्याची बाटली भरून त्यात साबण टाकून १० मिनिटे तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने ती नीट धुवा.

व्हिनेगर आणि गरम पाणी

पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी बाटलीमध्ये थोडेसे व्हिनेगर टाका आणि त्यात गरम पाणी टाकून बाटली रात्रभर तशीच राहू द्या. सकाळी बाटली स्वच्छ पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरूनही पाण्याची बाटली साफ करता येते. यासाठी बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि कोमट पाण्याने ती भरा. नंतर झाकण उघडून काही तास तसंच ठेवा. नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवा.

व्हिनेगर वापरा

पाण्याच्या बाटलीला दुर्गंधी येत असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर वापरा. यासाठी 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचे बेकिंग सोडा घालून बाटलीत टाका आणि थोड्या वेळाने बाटली स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT