Gen Z Travel Trends India Sakal
लाइफस्टाइल

Gen Z Travel Trends: क्लियरट्रिपने उलगडला Gen Zच्या प्रवासातील बदल; सोलो ट्रिप्स, यूपीआय आणि लॉयल्टी कॉइन्सचा वाढता वापर

How Gen Z is Changing the Travel Industry in India: क्लिअरट्रिपच्या अहवालानुसार जेन झेडचा कल सोलो ट्रिप्स, यूपीआय पेमेंट आणि लॉयल्टी कॉइन्सकडे वाढतो आहे.

सकाळ वृत्तसेवा

Cleartrip Reveals Gen Z Travel Trends in India: जनरेशन झेड पिढी एकट्याने प्रवास करत आहे, स्‍वत:हून डिजिटली पेमेंट करत आहेत. क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनी आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान प्‍लॅटफॉर्मने आपल्‍या नवीन अहवालामधील नवीन डेटा जारी केला आहे.

या डेटामधून निदर्शनास येते की, जनरेशन झेड पर्यटक भारतातील ट्रॅव्‍हल क्षेत्राला नवीन आकार देत आहेत. प्रबळ डिजिटल व महत्त्वाकांक्षी मानसिकतेसह हा समूह आधुनिक काळातील प्रवास करण्‍याच्‍या पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे, ज्‍यामधून स्‍वावलंबीत्व, स्थिरता आणि आरामदायी व वैयक्तिक स्‍वातंत्र्यावर खर्च करण्‍याची इच्‍छा दिसून येते.

''जनरेशन झेड पर्यटक प्रवासाच्‍या नियमांना नवीन आकार देत आहेत. त्‍यांच्‍यासाठी प्रवास फक्‍त विरंगुळा नाही तर जीवनशैली निवड असण्यासोबत त्‍यामधून ते स्‍वयं-अभिव्‍यक्‍ती व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करतात,'' असे क्‍लीअरट्रिपचे प्रवक्ता म्‍हणाले. 'ते स्‍वावलंबी, डिजिटली जाणकार आहेत आणि वैयक्तिकृत, आरामदायी अनुभवांवर खर्च करण्‍यासाठी अधिक उत्‍सुक आहेत. तसेच ते समकालीन ग्रुपने प्रवास करण्‍यापेक्षा एकट्याने किंवा मनाजोगता प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहेत.''

क्‍लीअरट्रिप जनरेशन झेड ट्रॅव्‍हल रिपोर्टमधील ठळक वैशिष्‍ट्ये:

जनरेशन झेड पिढी एकट्याने प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहे

क्‍लीअरट्रिप डेटानुसार, जनरेशन झेड पिढी अधिककरून एकट्याने प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहे, जेथे इतर वयोगटांच्‍या तुलनेत या समूहामध्‍ये एकट्याने प्रवास करण्‍याचे प्रमाण ७ टक्‍के आहे. यामधून समकालीन कौटुंबिक ट्रिप्‍समध्‍ये मोठे बदल होत असल्‍याचे दिसून येते, जेथे बजेट व निवडी ठरवल्‍या जातात आणि ट्रिपमध्‍ये वयोवृद्ध सदस्‍य देखील असतात. आजच्‍या काळातील जनरेशन झेड पर्यटक त्‍यांच्‍या आवडीचे आणि उत्‍साहपूर्ण अनुभव देणाऱ्या गंतव्‍यांना एक्‍स्‍प्‍लोअर करतात, जेथे समकालीन पर्यटन स्‍थळांऐवजी साहस, निसर्ग आणि शांतमय गंतव्‍यांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

स्‍मार्ट व स्थिर पेमेंट्स जनरेशन झेड पिढीच्या प्रवास निवडींना परिभाषित करतात

या स्‍वावलंबी प्रवास करण्याच्या मानसिकतेमधून ट्रिप्‍ससाठी त्‍यांच्‍या पेमेंट करण्‍याच्‍या पद्धती देखील निदर्शनास येतात. जनरेशन झेड क्रेडिट कार्ड्सपेक्षा यूपीआय आणि डेबिट कार्डाचा वापर करत आहेत, जेथे इतर ग्रुप्‍सच्‍या तुलनेत १० टक्‍के अधिक यूपीआय व्‍यवहार केले जातात. ईएमआय-आधारित ट्रॅव्‍हल पेमेंट्सना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य दिले जात आहे, जेथे १० टक्‍क्‍यांहून अधिक जनरेशन झेड युजर्स या मोडचा अवलंब करत आहेत. यामधून जनरेशन झेडची बजेटच्‍या अडचणींवर मात करत आरामदायीपणे प्रवास करण्‍याची प्रबळ महत्त्वाकांक्षा दिसून येते.

जनरेशन झेड सोयीसुविधेला प्राधान्य देतात

आणखी एक उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड म्‍हणजे प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत जनेरशन झेड पिढी कार्डचा वापर करत बुकिंग्‍ज करण्‍यामध्‍ये वाढ झाली आहे; यामधून सोयीसुविधा आणि संपूर्ण सर्विस मिळण्‍याला प्राधान्‍य दिले जात असल्‍याचे निदर्शनास येते.

स्थिरता आणि मूल्‍य प्रमुख स्रोत आहेत

जनरेशन झेड पर्यटक क्‍लीअरट्रिपच्‍या क्‍लीअरचॉईस सारख्‍या स्थिर प्रवास पर्यायांचा अवलंब करण्‍याची शक्‍यता आहे, यामधून ते सहजतेला आणि त्‍यांच्‍या इच्‍छेप्रमाणे प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत असल्‍याचे दिसून येते. तसेच, १० पैकी एक सुपरकॉईन्‍स सारखे रिवॉर्ड पॉइण्‍ट्स रिडिम करण्‍याची आणि इतर वयोगटांच्‍या तुलनेत ट्रॅव्‍हल कूपन्‍स दीडपटीहून अधिक वापरण्‍याची शक्‍यता आहे, यामधून मूल्‍य-केंद्रित प्रवासावरील त्‍यांचा भर दिसून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

Satara News:'स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीकडून पिंपोडेत रास्ता रोको'; रस्ता खाेदल्याने अनेकांचे हातपाय मोडले, आंदोलनस्थळी लोकवर्गणी गोळा

SCROLL FOR NEXT