लाइफस्टाइल

नारळाचं पाणी प्या अन् रहा कूल; जाणून घ्या फायदे

शर्वरी जोशी

उन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक समस्या जाणवू लागतात. यात सगळ्यात त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे उष्णतेमुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे येणारा थकवा. तसंच वातावरणातील उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि परिणामी सतत तहान लागते. यातच तहान लागल्यावर आपसुकच आपली पावले कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम यांच्याकडे वळतात. परंतु, हे पदार्थ काही काळच सुखावह वाटतात. कारण, ठराविक वेळेनंतर पुन्हा तहान लागते. त्यामुळे अशा वेळी कोणतेही शीतपेय पिण्याऐवजी ताक, नारळपाणी, सरबत, पन्हं अशा घरगुती आणि शरीरासाठी फायदेशीर पेये प्यावेत. ही पेये पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे यापैकी एक म्हणजे नारळपाणी पिण्याचे फायदे कोणते ते आज आपण जाणून घेऊयात.

१. रक्तदाब नियंत्रणात राहतो -

नारळ पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहतो. नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम असते. त्यामुळे शरीरावर सोडिअमचा होणारा परिणाम नियंत्रणात ठेवण्याचं काम नारळपाणी करतं. त्यामुळे दररोज १ नारळ पाणी पिणं गरजेचं आहे.

२. अन्नपचन सुरळीत होतं -

नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. त्याच्या तुलनेत पोटॅशिअम आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. फायबरमुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे अन्नपचन सहज आणि लवकर होतं.

३. डोकेदुखीवर उपयुक्त -

अनेकदा उन्हात फिरल्यामुळे किंवा वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र, या काळात नारळपाणी पिणे फायद्याचं ठरतं. अनेकदा मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळेही डोकेदुखी होते. त्यामुळे नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यामुळे शरीरातील मॅग्नेशिअमची कमतरता दूर होते.

४. डिहायड्रेशनवर उपयुक्त -

धावपळ,उन्हात फिरणे, श्रमाची कामे केल्यास थकवा येतो. परिणामी, अनेकांना डिहायड्रेशनही होतं. त्यामुळे अशा वेळी नारळ पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. सोबतच थकवाही दूर होतो.

५. वजन कमी करण्यास मदत -

वजन कमी करायचं असेल तर नारळ पाणी नक्की प्या. कारण नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. ज्यामुळे बराच वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं आणि त्यामुळे लवकर भूकही लागत नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT