Coconut Water Side Effects esakal
लाइफस्टाइल

Coconut Water Side Effects: नारळपाणी पिण्याचे आहेत अनेक तोटे, या लोकांनी घ्यावी खास काळजी,नाहीतर...

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते

Pooja Karande-Kadam

Coconut Water Side Effects: नारळ पाण्याला अमृताची उपमा दिली जाते. हे शरीरातील ताकद वाढवण्याचे काम करते. त्यामुळे अशक्त असलेल्या व्यक्तीला सलाईन नाहीतर नारळ पाणी पिण्यास सांगितले जाते. नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.

नारळ पाणी हे एक उत्तम पेय आहे जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. त्यात अमिनो अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, लोह इत्यादी घटक आढळतात. जे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

पण, एखादी गोष्ट अती झाली तर ती आपल्यासाठी हेल्दी राहत नाही. जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात प्यायले तर ते तुमच्या आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकते. चला तर मग जाणून घेऊया नारळाच्या पाण्याचे दुष्परिणाम.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक

नारळ पाणी हे गोड पेय नसले तरी त्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. कार्बोहायड्रेट्स आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन टाळायला हवे.कारण, यामुळे तुमच्या रक्तातील साखरेवर परिणाम होतो. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर नारळाचे पाणी पिणे टाळणेच योग्य ठरेल.

ब्लड प्रेशर

ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी नारळाच्या पाण्याचे सेवन हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही लो बीपीचे रुग्ण असाल, तर यापासून दूर रहा. तरीही तुमची इच्छा असेल नारळ पाणी प्यायची तर नारळ पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डायरियाची समस्या

जर तुम्ही नारळाचे पाणी जास्त प्रमाणात प्यायले तर त्यामुळे डायरियाची समस्या होऊ शकते. यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे डायरिया होतो. तुम्हाला पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने फुगण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे सकस आहार घेण्यासोबतच नारळाचे पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे.

मूत्रपिंडावर होतो परिणाम

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते जे किडनीसाठी हानिकारक आहे. ज्याचा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही किडनीचे रुग्ण असाल तर नारळ पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.  (Coconut Water)

वजन वाढणे

ज्या लोकांना वजन कमी करायचे असते. असे लोक जास्त पाण्याचे सेवन करतात. ज्यामुळे त्यांना भूक कमी लागते. पण तुम्ही वेट लॉसच्या दरम्यान नारळ पाणी पिण्याचा विचार करत असाल हे चुकीचे ठरेल.   

कारण, नारळाच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत तुम्ही जास्त नारळ पाणी प्यायल्यास तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे नारळपाणी जास्त प्रमाणात पिऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT