Consumer court  google
लाइफस्टाइल

Consumer court : एकाच दिवशी ३२ वेळा EMI request पाठवणाऱ्या कंपनीला दंड

या कर्जाचे सर्व २४ हप्ते वेळेवर न भरल्यामुळे त्यावर लागणार दंड तक्रारदार फाल्गुनी कुरणी यांनी बजाज फिनसर्व कंपनीकडे भरला होता.

नमिता धुरी

मुंबई : कर्जाचे सर्व हप्ते भरल्यानंतरही अतिरिक्त दंडाचा भार सोसावा लागणाऱ्या ग्राहकाला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलासा दिला आहे. एकाच दिवशी तब्बल ३२ वेळी ईएमआय विनंती पाठवणाऱ्या कर्ज वितरण कंपनीला आयोगाने दंड ठोठावला आहे.

बजाज फिनसर्व प्रा. लि. कंपनी या कंपनीकडून तक्रारदार फाल्गुनी कुरानी यांनी १ लाख ५३ हजार ९७८ इतके कर्ज घेतले होते. या कर्जाचे सर्व २४ हप्ते वेळेवर न भरल्यामुळे त्यावर लागणार दंड तक्रारदार फाल्गुनी कुरणी यांनी बजाज फिनसर्व कंपनीकडे भरला होता.

तक्रारदार EMI त्यांच्या कर्नाटक बँक लिमिटेड या बँकेतून ONLINE भरत होत्या. बजाज फिनसर्व कंपनीने १९ जुलै २०१९ रोजी तक्रारदारांच्या बँक खात्यामध्ये एकाच दिवशी ७ EMI विनंत्या पाठवल्यामुळे तक्रारदारांना प्रत्येकवेळी रु.५९०/- इतका दंड बँकेने लावला होता.

तसेच ११ डिसेंबर २०२० रोजी बजाज फिनसर्व कंपनीने एकाच दिवशी ३२ वेळा तक्रारदार फाल्गुनी यांच्या बँक खात्यात ३२ वेळा EMI विनंत्या सादर केल्या होत्या. त्यामुळे दर वेळेला रु. ५९० याप्रमाणे बँकेने फाल्गुनी याना दंड लावला होता.

कर्ज देणारी कंपनी बजाज फिनसर्वने हेतू पुरस्सर तक्रारदार फाल्गुनी कुरानी यांच्या बँकेत वेळोवेळी EMI विनंती पाठविल्यामुळे तक्रारदाराच्या बँकेने दंडात्मक शुल्क आकारले.

बजाज फिनसर्व कंपनीने तक्रारदार यांना सेवा पुरविण्यात कसूर केल्यामुळे व तक्रारदाराचे वकील महादेव ढोणे यांनी सादर केलेले सर्व पुरावे व युक्तवाद ग्राह्य धरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगातील अध्यक्ष रा. गो. वानखेडे, सदस्य श्रद्धा जालनापूरकर व प्रीती चामीकुट्टी यांच्या खंडपीठाने कंपनीला दंड ठोठावला आहे.

फाल्गुनी यांना रु. २३०१०/- देण्याचे तसेच मानसिक त्रासापोटी रु.५०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.५०००/- देण्यात यावे असे आदेश आयोगाने दिले आहेत, असे अॅड. ढोणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT