Eggs
Eggs sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात अंडी खावीत का?

सकाळ डिजिटल टीम

दररोज अंडी खाणं अनेकांना आवडतं. काहींना अंडी उकडवून खायला आवडते तर काहींना ऑम्लेट बनवून. कुणी अंडी करी तर कुणाला अंड्याची भुर्जी खातात. काही लोक तर दिवसातून तीन-चार अंडी खातात. परंतु दिवसातून जास्त अंडी खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले? मुळात उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य आहे का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (Consumption of eggs in the summer season is bad for health?)

उन्हाळ्यात अंडी खावीत का?

अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते, जे डोळे, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त, त्यात फॉस्फरस, लोह, जीवनसत्व A, B6, B12, सेलेनियम, झिंक, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, मॅग्नेशियम, फोलेट, सोडियम इत्यादींचा समावेश असतो. अंड्यात उष्णतायुक्त प्रथिने जास्त असल्याने उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्यास शरीरातील उष्णता आणखी वाढते. पोटाचे आजार, अपचन, अशा अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात (Should you eat eggs in summer?)

अधिक अंडी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया.

  • मेडिसर्कलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अंड्यांमध्ये साल्मोनेला (Salmonella) नावाचा बॅक्टेरिया आढळतो. जो कोंबडीपासून अंड्यात येतो. आपण अंडी नीट उकडली नाहीत तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जातो.

  • योग्य प्रकारे शिजवलेले अंडी खाणे फायदेशीर आहे. कच्ची अंडी खाणं चुकीचं असून त्यामुळे पोटात सूज येणे, उलट्या होणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

  • अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर इतरही अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो (How much should we consume?)

  • काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असते, अशा लोकांनी अंडी खाणे सरळ टाळावे.

  • रोज 1-2 अंडी खाण्यात काही नुकसान नाही, पण उन्हाळ्यात दिवसा एकच अंडे खाण्याचा प्रयत्न करा.

  • तुम्ही अंड्यांसोबत काय खात आहात, या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा, चुकीचे फूड कॉम्बिनेशन आरोग्याला हानीकारक ठरू शकते.

  • अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल देखील असते, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अंडी दररोज खाऊ नयेत. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT