Cleaning Tips 
लाइफस्टाइल

Cleaning Tips : गौरी-गणपतीला वापरलेली तांब्या पितळेची भांडी 'अशी' करा लख्ख!

गणपती-गौराईच्या पूजेसाठी वापरलेल्या पूजेच्या भांड्यांची साफ-सफाई केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व आहे. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. नुकतेच घरच्या गणपतींचे विसर्जन झाले. त्यामूळे सध्या सगळीकडे गणपती बाप्पासाठी केलेले डेकोरेश उतरवण्याची लगभग सुरू झाली आहे. (copper and brass pots cleaning tips)

गणपती-गौराईच्या पूजेसाठी वापरलेल्या पूजेच्या भांड्यांची साफ-सफाई केली जात आहे. यामध्ये तांब्याची, पितळेची भांडी, दिवे, समई, ताट, ताम्हण यांना चकचकीत करण्यासाठी अनेकजण पितांबरीचा वापर करतात. परंतु यामुळे भांडी साफ करूनही पुन्हा काळपट दिसू लागतात. अशावेळी तुम्ही पितांबरी ऐवजी आम्ही दिलेल्या नवीन टिप्स नक्की ट्राय करा..

तांब्या, पितळेची भांडी लख्ख करण्यासाठी टिप्स

  • तुम्ही चिंच, लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता. गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. त्यामध्ये चिंच, लिंबाचा रस आणि मीठ घाला. या सर्व मिश्रणात तांब्या, पितळेची भांडी घाला आणि ती उकळून घ्या. या उपायाने भांडी लख्ख निघतील.

  • एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या. या पाण्यात वॉशिंग पावडर घाला. गॅस बंद करून यात हळद घाला. या मिश्रणात पितळेची भांडी थोडावेळ भिजत ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने भांडी धुवून घ्या.

  • फक्त लिंबाच्या वापराने सुद्धा करू शकता. अर्धा लिंबू कापून त्याने भांडी घासा. काही वेळानंतर भांड्यावरील डाग नाहीसा होईल.

  • एका वाटीमध्ये लिंबू,एक चमचा मीठ आणि एक चमचा व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. भांडी साफ करायच्या चोथ्यावर मिश्रण घेऊन त्याने तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करा.

  • तांब्याची भांडी साफ करण्यासाठी आपण टोमॅटो केचपचा हि वापर करू शकता. टोमॅटो केचपमध्ये असणाऱ्या आम्लामुळे भांडी स्वच्छ निघतात. भांड्यावर केचअप लावून भांडी ठेवा. 5 ते 10 मिनिटानंतर भांड्यावरून हलक्या हाताने घासणी फिरवली तरी भांडे स्वच्छ होते.

  • एक चमचा लिंबाचा रस, डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर घालून ही भांडी स्वच्छ केल्यास तांब्याच्या भांड्यांवरील डाग नाहीसे होऊन भांडी लख्ख चमकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT