Blood esakal
लाइफस्टाइल

'या' दोन रक्तगटांच्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका!

'या' दोन रक्तगटांच्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका!

सकाळ वृत्तसेवा

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, व्यक्तीच्या रक्तगटानुसार कोरोना विषाणूचा शरीरावर परिणाम होतो.

कोरोना (Covid-19) विषाणूच्या अभ्यासात नवीन माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, व्यक्तीच्या रक्तगटानुसार (Blood Group) कोरोना विषाणूचा शरीरावर परिणाम होतो. विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तसेच, त्यानुसार रुग्ण लवकर किंवा नंतर बरा होतो. विशेषत: A आणि B रक्तगट असलेल्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

हा अभ्यास सर गंगाराम हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण औषध विभागाद्वारे करण्यात आला. फ्रंटियर्स इन सेल्युलर आणि इन्फेक्‍शन मायक्रोबायोलॉजीमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. ए आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता जास्त असते. या रक्तगटांचे लोक कोविडसाठी अत्यंत असुरक्षित आहेत, तर O आणि AB रक्तगट असलेल्या लोकांना संसर्गाचा कमी परिणाम झाला आहे. या संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, रक्तगटाचा रोगाची तीव्रता आणि मृत्यूशी कोणताही संबंध नाही.

पुरुषांना जास्त धोका

रक्त संक्रमण औषध विभागाचे डॉ. विवेक रंजन म्हणाले, या अभ्यासातून असेही आढळून आले आहे की, बी+ रक्तगटाच्या पुरुष रुग्णांना महिलांपेक्षा कोविड-19 चा धोका जास्त आहे. त्याचवेळी, 60 वर्षांच्या लोकांना ज्यांचा रक्त गट B आणि AB आहे, त्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता जास्त असते. रक्तगट A आणि Rh+ असलेल्या रुग्णांना कोरोनामधून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागला, तर रक्तगट O असलेले रुग्ण लवकर बरे झाले. या लोकांमध्ये बराच काळ संसर्गाची लक्षणे दिसून आली नाहीत.

2586 कोरोना बाधितांच्या डेटावर संशोधन

रुग्णालयाच्या संशोधन विभागाच्या सल्लागार डॉ. रश्‍मी राणा यांनी सांगितले की, रक्तगट आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध शोधण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये रक्तगटासह कोविड-19 ची संवेदनक्षमता, रोगावरील उपचार, बरे होण्यासाठी लागणारा वेळ आणि मृत्यूचे प्रमाण तपासण्यात आले आहे. या अभ्यासात 2586 कोरोनाबाधितांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना 8 एप्रिल 2020 ते 4 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT